एक दुजे के लिए...दोन्ही पायांनी दिव्यांग वधू- वर झाले विवाहबद्ध

एक दुजे के लिए...दोन्ही पायांनी दिव्यांग वधू- वर झाले विवाहबद्ध
Marriage
MarriageSaam tv

अमळनेर (जळगाव) : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं.. तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव.. दिस जातील.. दिस येतील.. भोग सरल.. सुख येईल!’ या गीताशी साधर्म्य असणारा प्रसंग दोन दिव्यांग वधू- वराच्या बाबतीत घडला. शरीराने सुदृढ असलेल्या मुलांनी घातलेल्या मागणीला शह देत वडाळा-वडाळी (ता. चाळीसगाव) येथील मनीषा आमले हिने वासरे (ता. अमळनेर) येथील विजय पाटीलला आपला जीवनसाथी निवडून त्याच्याशी विवाहबद्ध होण्याचा धाडसी निर्णय घेतला. येथील मराठा मंगल कार्यालयात दोन्ही पायांनी अधू असणाऱ्या वधू- वराच्या या आदर्श विवाहाने (Marriage) मराठा समाजात एक नवीन आदर्श पायंडा निर्माण करून दिला आहे. (jalgaon news amalner handycap Vadhu with both legs got married)

Marriage
स्‍त्री असल्‍याचे भासवून चॅटींग; नंतर अश्‍लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल

मराठा समाजात उपवर मुलामुलींचे लग्न जमविण्यासाठी वर- वधू पित्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. परंतु लग्नाचा गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, याचा प्रत्यय अमळनेरकरांना दिसून आला. (Jalgaon News) वासरे (ता. अमळनेर) येथील विजय लोटन पाटील हे दोन्ही पायांनी अपंग असून त्यांना आधाराशिवाय चालता येत नाही. तरी देखील ते पाडसे (ता. अमळनेर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत.

अन्‌ योग जुळून आला

सद्यस्थितीत मुलींचे प्रमाण कमी असल्याने सुदृढ तरुणाचे लग्न होण्यास अडचणी येतात तर मग आपण तर दोन्ही पायांनी अपंग आहोत; मग आपले लग्न कसे होईल? या विवंचनेत ते होते. त्यातच वडाळा- वडाळी (ता.चाळीसगाव) येथील मनीषा चुडामण आमले या नववधू पण दोन्ही पायांनी अपंग होत्या. त्यांनाही आधाराशिवाय चालता येत नव्हते. त्या सुद्धा चाळीसगाव येथे किराणा दुकान चालवून कुटुंबाला हातभार लावत होत्या. ‘हम बने ..तुम बने..एक दुजे के लिए’ असे म्हणत दोघांचेही योग जुळून आल्याने त्याचा आदर्श विवाह नुकताच पार पडला आहे. दोन्ही अपंगाचे ‘दोनाचे चार हात’ झाल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com