Amol Mitkari: अब्‍दुल सत्‍तारांचे कोणते हिंदुत्‍व; अमोल मिटकरी यांची टीका

अब्‍दुल सत्‍तारांचे कोणते हिंदुत्‍व; अमोल मिटकरी यांची टीका
Amol Mitkari Abdul Sattar
Amol Mitkari Abdul SattarSaam tv

जळगाव : शिवसेनेतील चाळीस आमदार फुटून बाहेर पडले आहेत. एक वेळेस समजू शकतो, की चाळीस आमदार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेले. मात्र अब्दुल सत्तार (Abdul Sattar) कशाला गेले हे मोठ कोडंच आहे. सत्तार यांचे कोणते हिंदुत्व आहे; अशी खोचक टीका आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. (Jalgaon News Amol Mitkari)

Amol Mitkari Abdul Sattar
महिलेची हत्‍या करत कॅरीबॅगमध्‍ये टाकून मृतदेह फेकला; मुक्‍ताईनगर परिसरातील धक्‍कादायक घटना

मुक्‍ताईनगर तालुक्यातील बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) जनसंवाद यात्रामध्ये आमदार मिटकरी बोलत होते. मिटकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर देखील निशाणा साधत मुनगंटीवार यांनी नवीन जीआर काढला. हॅलो म्हणायचे नाही तर वंदे मातरम म्हणा; असे म्‍हणत मुनगंटीवार यांची खिल्ली उडवली. तसेच या लोकांनी देशाची लोकशाही पायदळी तुडवली असल्‍याचे देखील त्‍यांनी म्‍हटले आहे. (BJP) भाजपवर शेरोशायरीत मिटकरींची टीका करत शरम तो उनको आती है जो शरम को शर्माते है येतो इतने बेशरम है की शरम इनको शर्माती है.

राणा दाम्‍पत्‍यावर निशाणा

आमदार मिटकरी यांनी राणा दाम्‍पत्‍यावर निशाणा साधताना विदर्भात सर्वात जास्त प्रॉडक्ट विकतात ते रवी राणा आणि त्यांच्या पत्नी आमच्या ताई नवनीत राणा यांचे. माणसाने हनुमान चालीसा मनापासून वाचली; तर त्याला कुठला त्रास होत नाही. परंतु दोन पती- पत्नी हे हनुमान चालीसा वाचली आणि त्यांना जेलमध्‍ये बसावे लागले असल्‍याचे म्‍हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com