Ashadhi Ekadashi: विटेवर साकारले विठुराया

विटेवर साकारले विठुराया
Ashadhi Ekadashi
Ashadhi EkadashiSaam tv

जळगाव : जळगाव शहरातील मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील अवलिया शिक्षक, पर्यावरण मित्र, चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे (Ashadhi Ekadashi) औचित्‍य साधून चक्क विटेवर विठ्ठलाचे मनमोहक व आकर्षक असे चित्र रेखाटले. (jalgaon news Ashadi Ekadashi Vithuraya drawing on Vita)

Ashadhi Ekadashi
Aurangabad: ५० पेक्षा अधिक लग्नाळुंना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाहा रॅकेट कसं चालायचं?

चित्रकार सुनिल दाभाडे यांनी याआधी ही (Jalgaon News) वेगवेगळे प्रयोग केले. जसे ज्वारीच्‍या भाकरीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्र रेखाटले होते. त्या पेंटीगची नोंद ओ.एम.जी नॅशनल बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच पेंटीगमध्ये गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. तव्यावर कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे चित्र रेखाटले आहे. नवरात्रात चक्क सुपारी नऊ दिवसाचे नऊ देवीचे चित्र काढले होते.

कोरोना काळात चौकात चित्र

कोरोना (Corona) काळात सुनिल दाभाडे यांनी चौकाचौकात जाऊन रस्त्यावर कोरोना विषयी चित्र काढुन जनजागृती केली आहे. असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपले व शाळेचे नाव जगाचा पाठीवर नेले आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलीया, मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी, सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सुनिल दाभाडे सरांचे अभिनंदन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com