कुत्र्याने बालकास जबड्यात धरून नेले फरफटत; नागरीकांमुळे झाली सुटका

कुत्र्याने बालकास जबड्यात धरून नेले फरफटत; नागरीकांमुळे झाली सुटका
कुत्र्याने बालकास जबड्यात धरून नेले फरफटत; नागरीकांमुळे झाली सुटका

जळगाव : भटक्या कुत्र्याने बालकाला फरफटत नेले. ग्रामस्थांनी आरडाओरड करत कुत्र्याला हुसकावून लावल्‍याने बालकाचा जीव वाचला. सदर घटना जळगाव तालुक्यातील असोदा येथील धनाजीनगरमध्ये आज सकाळी आठच्‍या सुमारास घडली. (jalgaon-news-asoda-village-four-year-child-injured-dog-attack)

असोदा (ता. जळगाव) येथे सकाळी आठच्या सुमारास प्रशांतजीत पवन सोनवणे (वय ४) हा बालक घराजवळ शौचास बसला होता. त्याचवेळी त्‍या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्‍ला चढवत शर्टाची कॉलर धरत फरफटत नेऊ लागला. यावेळी बालक रडू लागल्‍यानंतर सदर प्रकार ग्रामस्थांच्‍या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड केली. यामुळे कुत्र्याने पळ काढला.

कुत्र्याने बालकास जबड्यात धरून नेले फरफटत; नागरीकांमुळे झाली सुटका
ब्रश नव्‍हे कापड व हाताच्या बोटांचा ब्रश प्रमाणे वापर; रेखाटले सुंदर चित्र

हाताला चावा

कुत्र्याने बालकाला फरफटत नेत असताना नागरीकांनी आरडाओरड केल्‍यानंतर कुत्र्याने पळ काढला. मात्र तोपर्यंत काही अंतरापर्यंत कुत्र्याने नेत बालकाच्‍या उजव्या हाताला चावा घेतला. घटनेत बालकाच्या उजव्या हाताला कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. बालकांच्या कुटुंबीयांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे आणि पथकाने त्याच्यावर उपचार

भटक्‍या कुत्र्यांचा त्रास वाढता

जळगाव शहरासह ग्रामीण भागात भटक्‍या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. शिवाय महामार्गावर देखील वाहनांच्‍या मागे धावून चालकावर हल्‍ला करत आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com