Jalgaon: एटीएम कार्ड बदलून तरुणाची फसवणूक

एटीएम कार्ड बदलून तरुणाची फसवणूक
ATM Crime
ATM CrimeSaam tv

जळगाव : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणाला अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंतवून एटीएम (ATM) कार्डची अदलाबदली केली. यानंतर खात्यातून ३७ हजार ५०० रुपये काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हापेठ पोलिस (Police) गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon ATM Crime)

ATM Crime
धक्कादायक..पत्नीचा मृतदेह वाहनांतून नेताना डॉक्टर पती ताब्यात; खून केल्‍या झाले स्‍पष्‍ट

जळगाव (Jalgaon) शहरातील सुप्रीम कॉलनीतील विठ्ठल मेरचंद पवार (वय ३८) हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल पवार हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजळील एसबीआय बँकेच्या (Bank) मुख्य शाखेत आला होता. बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे (ATM Crime) काढत असताना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल पवार याला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या एटीएमची अदलाबदली केली.

३७ हजार ५०० केले लंपास

त्यानंतर पैसे निघाले नाही, म्हणून विठ्ठल पवार बाहेर निघाला. थोड्या वेळानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३७ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत विठ्ठल पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com