पहाटे पाचच्या अगोदरची अजान भोंग्यावर नाही; जळगावात मशिद ट्रस्टी मौलवी बैठकीत निर्णय

पहाटे पाचच्या अगोदरची अजान भोंग्यावर नाही; जळगावात मशिद ट्रस्टी मौलवी बैठकीत निर्णय
पहाटे पाचच्या अगोदरची अजान भोंग्यावर नाही; जळगावात मशिद ट्रस्टी मौलवी बैठकीत निर्णय
Jalgaon Latest Marathi NewsSaam tv

जळगाव : पहाटे पाच वाजेच्या अगोदर भोंग्यावर होणारी अजान आता बंद होईल, तर इतर चार अजान कमी डेसिबलमध्ये भोंग्यावर होतील, तर जूननंतर पहाटे सहा वाजता अजान असते ती मात्र कमी डेसिबलने भोंग्यावर करण्यात येईल. भोंग्यांबाबत कोणत्याही राजकीय वादात सहभाग न घेता, जे विरोध करण्यास येतील त्यांना थेट विरोध न करता शांततेच्या मार्गाने सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे (Police) सहकार्य घेण्यात येईल, असा निर्णय जळगाव येथे मशीद ट्रस्टी व मौलवीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा मुस्लीम इदगाह कमिटीचे सचिव फारुख शेख यांनी दिली. (jalgaon news azan before five in the morning is not on the buzzer)

Jalgaon Latest Marathi News
आनंदाची बातमी! यंदा वरुणराजाचं आगमन 10 दिवस लवकरच; कोकण-मुंबईत होणार दाखल

राज्यात मशिदीवरील भोंग्याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत जळगावात (Jalgaon) कायदा सुव्यवस्था चांगली रहावी यासाठी जळगाव जिल्हा मुस्लीम इदगाह कमिटीतर्फे शहरातील मशीद ट्रस्टी व मौलवींची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. इदगाह मैदानात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कमिटीचे जिल्हाध्यक्ष वहाब मलीक, सरचिटणीस फारुख शेख यांच्यासह शहरातील ५८ मशिदींचे ट्रस्टी व मौलवी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना कमिटीचे सचिव फारुख शेख यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमाबाबत २००५ मध्ये आदेश दिले होते. त्याचे पालन २०२२ मध्ये होत आहे, त्याचे आम्ही स्वागतच करतो. भोंग्यावरील अजानाचा वाद राजकीय आहे. त्यामध्ये आम्हाला पडायचे नाही. त्यामुळे न्यायालयाच्या नियमाप्रमाणे सद्या पहाटे पाच वाजेच्या अगोदर होणारी अजान भोंग्यावर होणार नाही, मात्र दिवसभरातील इतर चार अजान भोंग्यावर होतील, मात्र त्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कमी डेसिबलने होतील. तर जूननंतर पहाटेची अजान ही सकाळी सहा वाजेनंतर करण्यात येते, त्यामुळे न्यायालयाच्या नियमानुसार ही अजान भोंग्यावर कमी डेसिबलच्या आवाजाने करण्यात येईल. (Jalgaon Latest Marathi News)

विरोधाचा सन्मान करणार

या निर्णयानंतरही काही संघटनांनी विरोध करून मशिदीसमोर हनुमान चालिसा वाचन केल्यास त्या विरोधाचा सन्मान करण्यात येईल, त्यांना थेट विरोध करण्यात येणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे. विरोध करण्यास आलेल्या संघटनांना पाणी व चहा देवून स्वागत करण्यात येईल. त्यांच्या आंदोलनाला विरोध न करता त्या आंदोलनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पोलीसांना देण्यात येईल, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस त्यानुसार कारवाई करतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.