जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन; मुळगावी अंत्‍यसंस्‍कार

जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन; मुळगावी अंत्‍यसंस्‍कार
जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन; मुळगावी अंत्‍यसंस्‍कार

जळगाव : भडगाव शहरातील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे या जवानाचा लेह- लडाख येथे कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला. त्यांचे पार्थीव आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी आले असून शासकीय इतमामात त्‍यांच्‍यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात निलेश ला निरोप देण्यात आला. (jalgaon-news-bhadgaon-Jawan-Nilesh-Sonawane-merged-into-Infinity)

भारतीय सैन्यदलातील जवान नीलेश रामभाऊ सोनवणे (वय ३०) लेह- लडाखमध्ये कर्तव्यावर असताना हुतात्मा झाले. येथील टोणगाव भागातील ते मूळ रहिवासी असून, या घटनेमुळे भडगाव शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली. नीलेश सोनवणे २०१० पासून भारतीय सैन्यात कार्यरत होते.

जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन; मुळगावी अंत्‍यसंस्‍कार
तामसवाडी गावठाण पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; २६ कोटीची तरतुद

शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार

भडगाव येथील टोणगाव भागातील रहीवाशी निलेश सोनवणे या जवानाचे कर्तव्यावर असतांना लेह- लडाखमध्‍ये निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी दहाला त्यांच्या राहत्या गावी आणण्यात आले. त्यानंतर गावात त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. शासकीय इतमामात निलेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com