नवरदेवाला हळदीच्या दिवशी मारहाण; जातीतील मुलीशी विवाह करीत असल्याचा राग

नवरदेवाला हळदीच्या दिवशी मारहाण; जातीतील मुलीशी विवाह करीत असल्याचा राग
नवरदेवाला हळदीच्या दिवशी मारहाण; जातीतील मुलीशी विवाह करीत असल्याचा राग
Jalgaon NewsSaam tv

भडगाव (जळगाव) ः आपल्या जातीच्या मुलीशी लग्न करीत असल्याच्या रागातून देव्हारी- कनाशी (ता. भडगाव) येथील नवरदेवाला हळदीच्या दिवशी जमावाने मारहाण केली. ही घटना ५ जूनला घडली. आपल्या भावी पतीला मारहाण करणाऱ्यांविरोधात नववधूने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon news bhadgaon police man beaten on marriage one day before)

Jalgaon News
वादळी वाऱ्याने विद्युत तार तुटली; धक्‍का लागल्‍याने बालकाचा मृत्‍यू

देव्हारी- कनाशी येथील समाधान पाटील (Jalgaon News) याचा विवाह ठरला होता. हा विवाह ६ जूनला देव्हारी-कनाशी येथे होणार असल्याने ५ जूनला समाधान पाटीलला हळद लावली जात होती. त्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास देव नाचविण्याचा कार्यक्रम सुरू असताना, सुकदेव देवराम सोनवणे, समाधान देवराम सोनवणे, दिलीप रतन गायकवाड (सर्व रा. देव्हारी), रोहिदास लक्ष्मण भिल (रा. बोदर्डे) हे २० ते २५ लोकांच्या जमावासह त्या ठिकाणी आले व समाधान पाटील हा आपल्या जातीच्या मुलीशी विवाह (Marriage) करीत आहे, याला जिवंत सोडू नका; असे म्हणत सुकदेव सोनवणे याने समाधानच्या हनुवटी व मानेवर कुऱ्हाडीने वार केला.

पोलिसांच्‍या गाडीवरही दगडफेक

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेली वऱ्हाडी मंडळी त्याला वाचविण्यासाठी आली असता, त्यांनाही जमावाने धमक्या देत घरातील, मंडपातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकल्या. याबाबत माहिती कळताच पोलिस घटनास्थळी आले असता, जमावाने पोलिसांशीही हुज्जत घातली. काही जणांनी पोलिसांच्या शासकीय वाहनावर (एमएच १९, सीझेड ८५९७) दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी नववधूने दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित सुकदेव सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप गायकवाड व रोहिदास भिल यांना ताब्यात घेतले. या सर्वांना भडगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com