बीएचआर प्रकरण; आमदार चंदू पटेलांविरूद्ध अटक वॉरंट

बीएचआर प्रकरण; आमदार चंदू पटेलांविरूद्ध अटक वॉरंट
बीएचआर प्रकरण; आमदार चंदू पटेलांविरूद्ध अटक वॉरंट
Mla chandu patelMla chandu patel

जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात अनेक दिग्गजांच्या अटकेनंतर गुन्ह्याच्या तपासात विधान परिषद सदस्य चंदू पटेल यांचेही नाव नंतर समाविष्ट करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पुणे पोलिस मागावर आहेत. पटेलांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले असून ते फरारी आहेत. (jalgaon-news-bhr-patsanstha-fraud-case-Arrest-warrant-against-MLA-Chandu-Patel)

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर पतसंस्थेत अवसायक नियुक्तीनंतर झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२०मध्ये पहिल्या टप्प्यातील अटकेनंतर दुसऱ्या टप्प्यात गेल्या महिन्यात डाळ उद्योजक प्रेम कोगटा, हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेरातील गिरीश महाजनांचे कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली.

Mla chandu patel
खडसेंमागे ‘भोसरी’चे शुक्लकाष्ठ; मंत्रिपदाचा राजीनामा..पक्षत्याग अन्‌ ‘ईडी’

तपासात वाढले संशयित

गेल्यावर्षीच या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास जसा पुढे सरकत आहे, तशी संशयितांची यादी वाढत असून आरोपी वाढत आहेत. त्यासाठीच दुसऱ्या टप्प्यातील अटक सत्र झाले. त्याचवेळी या गुन्ह्यात विधान परिषद सदस्य भाजप आमदार चंदू पटेल यांचे नाव समाविष्ट झाले होते. ज्यावेळी भंगाळे, कोगटा, तोतला आदी मंडळींना अटक झाली, तेव्हाच पटेल यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या निवासस्थानीही जाऊन आले, मात्र त्याआधीच पटेल फरारी झाले होते.

अन्य राज्यांत तपास

पटेल हे त्या दिवसापासूनच फरारी असून त्यांच्या तपासार्थ पुणे पोलिसांची पथके विविध ठिकाणी छापे मारत आहेत. तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेप्रमाणेच पटेलही यांनीही अन्य राज्यात आसरा घेत असल्याचे सांगितले जात आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com