डंपरच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू

डंपरच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू
डंपरच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू
Accident News

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने महामार्गावर तरसोद फाट्याजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एका अधिपरिचारिकेचा मृत्‍यू झाला आहे. सदर अपघात जळगाव– भुसावळ महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ घडला. (jalgaon-news-bhusawal-highway-accident-news-women-death)

Accident News
प्रेरणादायी..झोपडपट्टीतील ‘लक्ष्‍मी’ बनली त्‍यांच्‍यासाठी शिक्षिका

जळगाव– भुसावळ दरम्‍यानच्‍या महामार्गावर झालेल्‍या अपघातात अधिपरिचारिका प्रेरणा देविदास तायडे (वय ३२) यांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍या कंडारी (ता.भुसावळ) येथील मुळ रहिवासी असून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कामाला होत्या. आज सकाळी ड्युटी आटोपून त्‍या दुपारी दोनला घराकडे परत जात असताना प्रेरणा तायडे यांचा अपघात होवून मृत्‍यू झाला.

डंपरच्‍या पुढच्‍या चाकात दुचाकी

सदर दुर्घटनेत डंपरच्या (क्र. एमएच १९, वाय. ७७७३) पुढील चाकात प्रेरणा तायडे या चिरडल्‍या गेल्‍या. डंपरच्‍या चाकात दुचाकी पूर्णपणे दाबली गेली. घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुटूंबियाचा आक्रोश

प्रेरणा तायडे यांचा मृत्‍यू झाल्‍याची बातमी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला असलेले त्यांचे पती अमोल सपकाळे यांना कळविली. यानंतर त्‍यांच्‍या कुटूंबाने जळगावी धाव घेतली. प्रेरणा तायडे यांचा मृतदेह पाहून पती अमोल यांच्‍यासह कुटूंबियांनी आक्रोश केला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com