Railway News: पॅसेंजर होणार इतिहासजमा; उद्यापासून धावणार भुसावळ- इगतपुरी मेमू ट्रेन

पॅसेंजर होणार इतिहासजमा; उद्यापासून धावणार भुसावळ- इगतपुरी मेमू ट्रेन
memu train
memu trainbhusawal

जळगाव : कोरोना काळात बंद झालेली भुसावळ- मुंबई व देवळाली पॅसेंजरला आता पर्याय मिळालेला असून, गेल्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर १० जानेवारीपासून भुसावळ- इगतपुरी दरम्यान मेमू ट्रेन (Memu Train) धावणार आहे. यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (jalgaon-news-Bhusawal-Igatpuri-Memu-train-to-run-from-tomorrow)

memu train
Student News: विद्यार्थ्यांचा टपावर जीवघेणा प्रवास; एसटी बंदमुळे शिक्षणासाठी कसरत

कोरोना (Corona) काळात रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल झाले होते. (Bhusawal) भुसावळ- जळगाव, चाळीसगाव, पाचोरा किंवा त्यापुढे थोड्या अंतराचा प्रवास करण्यासाठी एक्सप्रेस गाडीचेच तिकीट काढावे लागत होते. यामुळे नाइलाजाने खिशाला कात्री लागत होती. तसेच तिकीटही वेटिंग मिळत होते. मात्र आता अप- डाऊन करणाऱ्यासह गावोगावी पॅसेंजर गाडीचा सहारा घेऊन उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या १० जानेवारी सोमवारपासून भुसावळ- इगतपुरी (Bhusawal Igatpuri Train) मेमू ट्रेन धावणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास कमी वेळेत सुखकर होणार आहे.

या क्रमांकाने धावणार मेमू ट्रेन

गाडी क्रमांक ११११९/२० या क्रमांकाने भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेन धावणार असून भुसावळ रेल्वे स्थानकावरून ही गाडी सकाळी ७ वाजता सुटेल व परतीच्या प्रवासात इगतपुरी येथून सकाळी ९ : ५५ मिनिटांनी भुसावळसाठी सुटेल.

पॅसेंजर गाड्या होतील इतिहासजमा

भुसावळ जंक्शन येथून भुसावळ- मुंबई, भुसावळ- देवळाली, भुसावळ- बडनेरा, भुसावळ- वर्धा, भुसावळ- कटणी, भुसावळ- पुणे असे पॅसेंजर गाड्या सुरु होत्या. मात्र कोरोना काळापासून हळूहळू पॅसेंजर गाड्या इतिहासजमा होत असून त्याऐवजी रेल्वे प्रशासनातर्फे मेमू गाड्या सुरु करण्यात येत आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावरून भुसावळ- बडनेरा, भुसावळ -इटारसी, भुसावळ- दौंड दरम्यान मेमूच्या स्वरूपात गाड्या सुरू करण्यात आले असून आता इगतपुरीसाठी मेमू गाडी धावणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com