भुसावळ– इगतपुरी मेमू नाशिकपर्यंतच धावणार

भुसावळ– इगतपुरी मेमू नाशिकपर्यंतच धावणार
Railway
RailwaySaam tv

जळगाव : चाकरमान्‍यांसाठी सोयीची ठरत असलेली भुसावळ ते इगतपुरी स्टेशन दरम्यान धावणारी मेमू गाडी पुढील आठवड्यात चार दिवस इगतपुरी न जाता नाशिक (Nashik) स्टेशनपर्यंतच धावणार आहे. यामुळे प्रवाशाची गैरसोय होणार आहे. (jalgaon news Bhusawal Igatpuri Memu will run till Nashik)

Railway
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चाळीसगावमधील संतापजनक घटना

काही दिवसांपुर्वी सुरू झालेली (Bhusawal) भुसावळ– इगतपुरी मेमूल काही दिवसांचा ब्रेक लागणार आहे. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८ मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ही गाडी नाशिकपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे (Indian Railway) प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. सदर मेमू गाडी ही नेमहीच्‍याच वेळेवर सुटेल.

तांत्रिक कामामुळे गैरसोय

२८ मे ते १ जूनपर्यंत तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे चार दिवस प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. या तांत्रिक कामामुळे मनमाडहून मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस उशिराने धावू शकतात; असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com