भुसावळात वीज कर्मचाऱ्यास मारहाण; वीज केली खंडीत

भुसावळात वीज कर्मचाऱ्यास मारहाण
mahavitaran
mahavitaran

भुसावळ (जळगाव) : वीज वितरण प्रशासनातर्फे थकबाकी असलेल्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत घरगुती तसेच व्यावसायिक व्यापाराचे बिल वसूल करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शहरातील स्टेशन रोड परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून वीज वितरणतर्फे थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरू न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. (jalgaon-news-Bhusawal-power-worker-beaten-The-city's-electricity-was-cut-off)

mahavitaran
वाहन अडवून शेतकऱ्याला लुटले; अज्ञात दरोडेखोरांचा हल्ला

शहरात महावितरण (Mahavitaran) प्रशासनातर्फे चार विभागात पथक तयार करून वीज बिल वसुली अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील स्टेशन रोड परिसरात सातारा पूल विभागातील कर्मचारी सुधीर भारंबे आणि संदीप सोनवणे हे वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले असता, एका व्यावसायिकाकडे घरगुती दोन बिल प्रत्येकी ३ हजार रुपये तर ६ हजार रुपये व्यावसायिक बिल अशी थकबाकी होती. कर्मचाऱ्यांनी या व्यवसायिकाचे बिल भरण्याची मागणी केली. भुसावळ (Bhusawal) शहरात एकूण 10 हजार ग्राहकांकडे साडेपाच कोटी रुपयांची वीज बिल (Electricity Bill) थकबाकी आहे.

गचंडी पकडून मारहाण

संबंधित व्यवसायकाने पैसे नसल्याचे सांगितले, तर कर्मचाऱ्यांनी घरगुती बिल नंतर भरा, अगोदर व्यवसायिक बिल भरण्याची सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या व्यावसायिकाने कर्मचारी संदीप सोनवणे यांची गचंडी पकडली तर सुधीर तांबे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ पोलिस (Police) ठाणे गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com