भुसावळ विभागातील रेल्‍वे वाहतूक दोन दिवस बंद; ३६ गाड्या रद्द

भुसावळ, जळगावमधून धावणाऱ्या ३६ प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्याने या गाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांचे आरक्षणाचे तिकीट सुध्दा रद्द होणार आहे.
भुसावळ विभागातील रेल्‍वे वाहतूक दोन दिवस बंद; ३६ गाड्या रद्द
Bhusawa; junction railway

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव ते भादली दरम्यान तिसऱ्या मार्गाची जोडणी करण्यासाठी यार्ड री- मॉडलिंग संदर्भात नॉन- इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले आहे. या पायाभूत सुविधांच्या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप- डाऊन मार्गावरील तब्बल ३६ प्रवासी रेल्वे गाड्या आणि १० मालवाहतूकीच्या पार्सल गाड्या १६ व १७ जुलैला रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. (jalgaon-news-bhusawal-railway-department-next-two-days-36-railway-cancel)

Bhusawa; junction railway
युवकाचा देशी जुगाड..कार धावते एक रूपयात ५० किमी

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ०१२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन विशेष राजधानी एक्स्प्रेस ही गाडी १६ आणि परतीच्या प्रवासात ही गाडी १७ जुलैला रद्द. ०२१६९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर विशेष अतिजलद गाडी १७ तर परतीच्या प्रवासात १६ जुलैला रद्द केली आहे. ०२२२३ पुणे- अजनी विशेष वातानुकूलित १६ तर परतीच्या प्रवासात १३ जुलैला तसेच पुणे- अमरावती विशेष वातानुकूलित १४ आणि परतीच्या प्रवासात १५ जुलैला रद्द. ०२२९३ लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज विशेष दुरांतो १६ तर परतीच्या प्रवासात १७ जुलैला रद्द केली आहे. ०२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस- आग्रा कॅंट विशेष अतिजलद १६ तर परतीची गाडी १७ जुलैला रद्द. ०२१८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर दुरांतो विशेष १७ आणि परतीच्या प्रवासात १६ जुलैला रद्द. ०२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती विशेष अतिजलद १७ आणि परत येतांना १६ जुलैला रद्द. ०१०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर विशेष १६ आणि परतीच्या प्रवासात १९ जुलैला रद्द. ०१०३९ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र विशेष एक्स्प्रेस ही गाडी १५ जुलै आणि परतीच्या प्रवासात १७ जुलैला रद्द. ०२०४२ नागपूर- पुणे हमसफर विशेष गाडी १६ जुलै आणि परत येतांना १५ जुलैला रद्द. ०२११३ पुणे- नागपूर विशेष वातानुकूलित १७ जुलैला आणि परत येतांना १६ जुलैला रद्द. ०२१३८ फिरोजपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंजाब मेल विशेष गाडी १८ जुलै आणि परतीच्या प्रवासात १६ जुलैला रद्द. ०२१७२ हरिद्वार- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष वातानुकूलित १६ आणि परतीच्या प्रवासात १५ जुलैला रद्द. ०९१०५ केवडिया- रीवा विशेष विशेष गाडी १६ जुलै आणि परत येतांना १७ जुलैला रद्द. ०९१२५ सूरत- अमरावती विशेष अतिजलद गाडी १६ तर परत येतांना १७ जुलैला रद्द. ०९०७७ नंदुरबार- भुसावळ विशेष गाडी १६ व १७ जुलैला आणि परतीच्या प्रासात १६ व १७ जुलैला रद्द. ०९००८ भुसावळ- सूरत विशेष १६ व १७ आणि परत येतांना १५ व १६ जुलैला रद्द केल्या आहे.

विशेष पार्सल गाड्या रद्द

देवळाली- मुजफ्फरपूर पार्सल विशेष १७ आणि परत येतांना १९ जुलैला रद्द, सांगोला- मनमाड पार्सल विशेष गाडी १७ जुलैला आणि मनमाड- दौंड पार्सल विशेष गाडी २० जुलैला रद्द. पुणे-दौंड पार्सल विशेष गाडी १७ जुलैला आणि परत येतांना २० जुलैला रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- शालीमार पार्सल विशेष गाडी १६ जुलैला आणि परतीच्या प्रवासात १८ जुलैला रद्द. हैदराबाद- अमृतसर पार्सल विशेष १६ जुलैला तर परतीच्या प्रवासात १८ जुलैला रद्द केल्या आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com