भुसावळात बसचालक- ठेकेदारात फ्रीस्टाईल

शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी सर्विस रोड बनविण्यात आले असून, या रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडून असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
भुसावळात बसचालक- ठेकेदारात फ्रीस्टाईल

भुसावळ (जळगाव) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पालखी हॉटेलजवळ सर्व्हिस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आरसीसी बांधकाम सुरू आहे. याठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यातच पडून असल्याने वाहतूकीची कोंडी होत असते. दुपार पावणे दोनच्या सुमारास भुसावळकडून वरणगावकडे बस जात असताना वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी बस चालक आणि ठेकेदार यांच्यात चांगलीच हाणामारी जुंपली, यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. (jalgaon-news-bhusawal-service-road-work-contractor-and-bus-driver-fight-on-road)

शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी सर्विस रोड बनविण्यात आले असून, या रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच पडून असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास पालखी हाँटेलजवळ भुसावळहुन वरणगावच्या रस्त्याने महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाची बस (क्र. एमएच २०, बीएल १६३८) जात असतांना व भुसावळकडे येणारे डंपर (एमएच १९, सीवाय २९४३) येताना वाहतुक कोडी झाली. यावरुन गटारीचे बांधकाम करणारा ठेकेदार व बस चालकामध्ये मोठा राडा झाला. यावेळी संबधितामध्ये अश्लील भाषेत एकमेकांना शिविगाळ करीत गोष्ट हातापायीपर्यत आली. ठेकेदार व बस चालकामध्ये भर रस्त्यावर वाद सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. ठेकेदार व बस चालकाच्या हमरीतुमरीमुळे बसमधील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

पोलिसांनी लक्ष देण्याची गरज

रस्त्यावर एवढा मोठा राडा सुरू असताना देखील पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. जर या ठेकेदार व बस चालकाच्या हमरीतुमरीमुळे एखादी अनुचित प्रकारची घटना घडली असती, तर या प्रकाराला जबाबदार कोण? अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये केली जात होती.

भुसावळात बसचालक- ठेकेदारात फ्रीस्टाईल
पुस्‍तकातील अभ्‍यास भिंतीवर; ध्येयवेड्या शिक्षकांनी भिंती केल्या बोलक्या

दररोजचे वाद

सर्व्हिस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आर.सी.सीचे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने दररोज किरकोळ वाद होत आहे. यातुन एखाद्या वेळी काही अनुचित घटना घडु शकते हे नाकारता येऊ शकणार नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सुचना दिल्या पाहिजे असे नागरीकांचे म्हणणे आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com