गणपती विसर्जनावेळी बालिकेचा बुडून मृत्‍यू

गणपती विसर्जनावेळी बालिकेचा बुडून मृत्‍यू
गणपती विसर्जनावेळी बालिकेचा बुडून मृत्‍यू

भुसावळ (जळगाव) : तीन दिवसाच्‍या गणपती विसर्जनासाठी गेलेल्‍या बालिकेचा बुडून मृत्‍यू झाला. भुसावळ शहरातील झेडटीसी भागाजवळच्या तापी नदीच्या पात्रात सदर घटना घडली. (jalgaon-news-bhuswal-tapi-river-Girl-drowned-during-Ganpati-visarjan)

झेडटीसी परिसरात वास्तव्याला असलेले मनीष यादव त्यांच्याकडे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसानंतर ते आज सकाळी विसर्जन करण्यासाठी झेडटीसीजवळ असणार्‍या तापी नदीच्या पात्रात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. यावेळी पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या ही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. यातच मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.

गणपती विसर्जनावेळी बालिकेचा बुडून मृत्‍यू
पर्यावरणाचा संदेश देत झाडाच्या फांदीत गणरायाची प्रतिष्ठापना

मुलाला वाचविण्यात यश

मुलगा व मुलगी बुडत असल्‍याने आरडाओरड सुरू झाली. या दरम्‍यान आर्यन याला वाचविण्यात यश आले. परंतु अनन्या यादव ही बालिका बुडाली. तिच्‍या मृत्‍यूने यादव परिवार शोकाकुल झाला आहे. अनन्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com