Jalgaon: अल्‍पवयीन मुलांना लावून दुचाकी चोरी; नऊ दुचाकी हस्‍तगत

अल्‍पवयीन मुलांना लावून दुचाकी चोरी; नऊ दुचाकी हस्‍तगत
Jalgaon Bike Robbery
Jalgaon Bike RobberySaam tv

जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्‍या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्‍या आहेत. याचा शोध घेत पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. याकरीता अल्‍पवयीन मुलांचा वापर केला जात असल्‍याचे समोर आले आहे. संबंधीताकडून चोरीच्या ९ दुचाकी (Bike Robbery) हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. (Jalgaon News Bike Robbery)

Jalgaon Bike Robbery
Nandurbar: पावसाची विश्रांती; कोळपणी, खत फवारणी शेती कामांना वेग

जळगाव (Jalgaon) शहरातून दुचाकी चोरी करायच्या व त्यांची विल्हेवाट लावायचे काम दादा बारकू ठाकुर करत होता. त्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तत्‍पुर्वी दोन दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलाला पथकाने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.

अल्‍पवयीन मुलांकडून चोरी

दुचाकी चोरीच्या रोजच्या होत असलेल्‍या घटना पाहता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना केल्या. पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरी करीत असल्याचे समोर आले. याबाबतचे पुरावे देखील पथकाला मिळून आले. त्याला ताब्यात घेतले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com