धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहारच्या तरुणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहारच्या तरुणाचा मृत्यू
धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहारच्या तरुणाचा मृत्यू
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे बिहारच्या एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवार (१० मे) रोजी सकाळी सात वाजता ही घटना घडली होती. मयताच्या खिशातील कागदपत्रांवरुन (Jalgaon News) ओळख पटली. टिंकुकुमार उमेश शर्मा (वय ३५, रा. मुंबई, मुळ रा. अजनावा, ता. मोहनपुर, जि. गया, बिहार) असे मृत तरुणाचे नाव आहे. (jalgaon news Bihar youth dies after falling from running train)

Jalgaon News
दुकानातील कामगारांनीच केला विश्‍वासघात; ७२ लाखांचे दागिने लुटले

मुंबईत (Mumbai) सलून व्यवसायीक म्हणुन कार्यरत असलेला टिंकुकुमार ९ मे रोजी रात्री ११ वाजता घरात कोणाला काही न सांगता बाहेर पडला. तर १० रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शिरसोलीजवळ तो धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना समोर आल्यानंतर तालुका पोलिस (Police) ठाण्याचे अनिल फेगडे, अनिल तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

आधारकाडेवरून पटली ओळख

टिंकुकुमारच्या खिशात मिळुन आलेले आधारकार्ड, पॅनकार्डवरुन त्याची ओळख पटली. यांनतर कुटुंबीयांना माहिती दिली. आज सकाळी त्याचे वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) आले होते. शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. टिंकुकुमार याचे लग्न झाले असून गेल्या वर्षभरापासून तो पत्नीपासून विभक्त राहत होता. वडीलांना सलुन व्यवसायात मदत करीत होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.