भाजपकडून मनपा इमारतीत धुराळणी; साथीच्‍या आजारांबाबत आंदोलन
Jalgaon Corporation

भाजपकडून मनपा इमारतीत धुराळणी; साथीच्‍या आजारांबाबत आंदोलन

भाजपकडून मनपा इमारतीत धुराळणी; साथीच्‍या आजारांबाबत आंदोलन

जळगाव : शहरातील वाढत्या डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांबाबत उपाययोजना करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. असा आरोप करत महापालिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज अनोखे आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी मनपा इमारतीत धुराळणी करत सत्‍ताधारी व प्रशासनाचा निषेध केला. (jalgaon-news-BJP-dusts-off-Municipal-Corporation-building-Movement-for-communicable-diseases)

शहरात डेंग्यू, मलेरिया तसेच चिकूनगुनिया यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. मात्र मनपाच्‍या आरोग्‍य विभागाकडून अजूनही सुस्‍तता दाखवत उपाययोजना करत नाही. याविरोधात भाजप महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक भगत बालाणी, माजी महापौर सिमा भोळे, महिला आघाडीच्या प्रदेशा उपाध्यक्षा उज्जवला बेंडाळे आदी उपस्थित आहेत.

Jalgaon Corporation
सावधान.. रुग्णवाढ देतेय तिसऱ्या लाटेचे संकेत

मनपा इमारतीत धराळणी

साथरोग नियंत्रणात आणण्याबाबत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन मात्र हातावर हात धरून बसले आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आज चक्क महापालिकेच्या इमारतीत धुराळणी करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. शहरात साथीचे आजार वाढू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे महापालिकेचे आवार दणाणले होते.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com