शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा सरकारचा हट्ट : आमदार भोळे

शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा सरकारचा हट्ट : आमदार भोळे
शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा सरकारचा हट्ट : आमदार भोळे
Suresh Bhole

जळगाव : शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेत शिक्षणाचा खेळखंडोबा ठाकरे सरकारने मांडला आहे. त्‍यानुसारच राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांची उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. (jalgaon-news-bjp-president-mla-suresh-bhole-insistence-to-turn-the-tide-of-education-by-closing-teacher-award)

राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद केली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणाऱ्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही, असा आरोपही जिल्हाध्यक्ष भोळे यांनी केला. राष्ट्रीय पातळीवर राज्यातील शिक्षकांचा सन्मान होत असताना शालेय शिक्षणात महत्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवून राज्य सरकारने आपले शिक्षणविरोधी धोरण उघड केले आहे.

शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवा

गेल्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले नाही. यावर्षी त्यासंबंधीचे कोणतेही परिपत्रकदेखील जारी केले नाही. शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही सरकारतर्फे निवड समिती किंवा निवड प्रक्रियाही जाहीर करण्यात आली नाही. गेल्या वर्षी पुरस्कारांची निवड न केल्याने जे आदर्श शिक्षक पुरस्कार व त्यापासूनच्या लाभापासून वंचित राहिले; त्यांची निवड करावी व यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करून शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवावा, अशी मागणीही या पत्रकात करण्यात आली आहे.

Suresh Bhole
Good News : नंदुरबारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

वेतनवाढीचा मुद्दाही टांगणीवर

शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत राज्यभरातील शिक्षकांची असंख्य गाऱ्हाणी सरकारदरबारी प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या वेतनवाढीचा मुद्दा प्रशिक्षणाची निरर्थक अट घालून सरकारने सतत टांगणीवर ठेवला आहे. फडणवीस सरकारने प्रशिक्षणाची अट रद्द करून तसा शासन निर्णय जारी केल्यानंतरही ठाकरे सरकार मात्र या अटीशी अडून बसले असून शिक्षकांना लाभापासून वंचित ठेवून सरकार गंमत पाहात असल्‍याचा आरोप आमदार यांनी केला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com