जनतेत या आमची ताकद दाखवतो; खडसेंना महाजनांचे आव्‍हान

जनतेत या आमची ताकद दाखवतो; खडसेंना महाजनांचे आव्‍हान
जनतेत या आमची ताकद दाखवतो; खडसेंना महाजनांचे आव्‍हान
girish mahajan eknath khadse

जळगाव : एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. कोथळी ग्रामपंचायतीत आपला सरपंच, मुक्‍ताईनगराचा नगराध्‍यक्ष हा त्‍यांचा आहे? हे जरा तपासून पहा. ताकद पहायची असेल तर जनतेत या; कारण अजून जिल्‍हा परिषदेचे घोडामैदान पुढे आहे; तेथे आमची ताकद दाखवितो अशा शब्दात माज मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंना थेट आव्हान दिले आहे. (jalgaon-news-bjp-strength-in-the-masses-girish-Mahajan-challenge-to-eknath-Khadse)

girish mahajan eknath khadse
खासदार सुभाष भामरेंना धक्‍का; तीनही माजी आमदारांनी राखला गड

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या विषयासंदर्भात खडसेंनी या निवडणुकीपासून भाजपने पळ काढल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी खडसेंवर घणाघाती टीका केली. महाजन म्‍हणाले, की ‍भाजप हा घाबरणारा पक्ष नाही; खडसेंनी आपली ग्रामपंचायत तरी ताब्यात आहे का? हे तपासावे असे देखील महाजन म्‍हणाले.

बँकेत अधिकाऱ्यांवर दडपण आणून विजय

राज्य सरकार पोलिसांना हाताशी धरून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला. तसेच जिल्हा बँक निवडणुकीत अधिकाऱ्यांवर दडपण आणून विजय मिळविला असल्याचा आरोप सुध्दा गिरीश महाजनांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com