हळद, कुंकू वाहून सुया टोचलेली काळी बाहुली दारात; वकील पत्नीच्या नावे अघोरी विधी

हळद, कुंकू वाहून सुया टोचलेली काळी बाहुली दारात; वकील पत्नीच्या नावे अघोरी विधी
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : अमावस्येचा बेत आखत शिवाजीनगर दाळफळ भागात काळ्या बाहुलीवर वकील पत्नीचे नाव लिहून हळद-कुंकवासह बाहुलीस सुया टोचत काळ्या जादूचा विधी मांडण्यात आल्याचे उघडकीस आले. याबाबत मंगळवारी (ता. २८) रात्री शहर पोलिस (Police) ठाण्यात पाच जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon news Black doll with needle piercing turmeric kumkum at the door Aghori ritual)

Jalgaon News
८३ वाहनांची बनावट नोंदणी; शासनाच्‍या ६६ लाख ६० हजार महसूलला चुना

जिल्‍हा न्यायायलतील ॲड. केदार भुसारी यांच्या पत्नी अंजली भुसारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी (Jalgaon News) अमावस्येच्या दिवशी दुपारी दीडला वीजपुरवठा खंडित झाला होता. अंजली पती केदार यांना जेवणाचा डबा देण्यासाठी न्यायालयात गेल्या होत्या. तेथून परतल्यावर त्यांना घराच्या दाराजवळ कणकेचा गोळा आढळून आला. त्यावर हळद, कुंकू वाहिलेली काळी बाहुली होती. बाहुलीवर पिवळ्या अक्षरात ‘अंजली’ असे नाव लिहले होते. त्यावर पिवळ्या फुल्या मारून सूया टोचण्यात आल्या होत्या. काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधल्या होत्या. एखाद्या तांत्रिकाने अघोरी विधीसाठी मांडणी करावी अगदी त्याप्रमाणे मांडणी पाहून अंजली यांचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने पती केदार यांना फोन करून बोलावून घेतले.

मालमत्तेच्या वादाचा प्रकार

भुसारी यांच्या शेजारीच प्रकाश रामेश्वर व्यास, त्यांची पत्नी ललिता व्यास, सुशील गोपाळ पंडित, विद्या गोपाळ पुरोहित, गौरीलाल रुपचंद पुरोहित ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ही जागा त्यांच्या सासऱ्यांनी तिघांना वापरण्यास दिली होती. २००७ मध्ये त्यांनी सांगूनही त्यांनी जागा सोडली नाही. त्यावरूनच ते भुसारी कुटुंबीयांशी वैरभावनेने वागत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सातत्याने जादु टोण्याचा प्रकार

भुसारी यांनी तिघांविरुध्द न्यायालयात दिवाणी स्वरुपाचा दावा दाखल केला आहे.त्याचा निकाल २०१७ मध्ये भुसारी यांच्या बाजूने लागला होता. त्याचाच वचपा काढून भिती घालण्यासाठी ३ फेब्रुवारीला दुपारी तीनला घराच्या दरावर, केसांची लट सोबत हळद, कुंकू टाकलेले दिसले. त्यानंतर .१४ जूनला पौर्णिमेच्या रात्री वाळत घातलेल्या कपड्यावर रक्त टाकले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com