Bhusawal: कंपनीत स्‍फोट; दोन मजुरांचा जागीच मृत्‍यू

कंपनीत स्‍फोट; दोन मजुरांचा जागीच मृत्‍यू
Bhusawal
Bhusawalsaam tv

भुसावळ (जळगाव) : सुनसगाव (ता. भुसावळ) रस्त्यावरील एका फॅक्टरीत वेल्डींग करीत असतांना झालेल्या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारी १ वाजेच्या सुमारास घडलेल्‍या घटनेतील मयतांत मध्यप्रदेशासह (Madhya Pradesh) भुसावळातील मजुराचा समावेश आहे. (jalgaon news Blast at the company Two workers died on the spot)

Bhusawal
मोबाईल क्रमांक बदलून आमदारांची कार परिवहन मंत्र्यांच्‍या नावे; तिघांना पोलिस कोठडी

सुनसगाव रस्‍त्‍यावरील दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनीत आज दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर स्‍फोट झाला. फॅक्टरीतील भरलेल्या ऑईल टाकीला दोन मजुर वेल्डींगचे काम करीत असतांना अचानक स्पार्किंग होवून मोठा स्फोट झाला. या घटनेत काशिनाथ सुरवाडे, खेमसिंग पटेल या दोन मजुरांचा जागीच मृत्यू (Death) झाला. स्फोटाच्या आवाजाने परीसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

आमदारही पोहचले घटनास्थळी

भुसावळ (Bhusawal) तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com