महाविकास आघाडीतील तीनही पक्षात घराणेशाही : गिरीश महाजन

चाळीस वर्ष या भागात सत्ता उपभोगलेल्‍या नेत्यांनी गावात साधी पाणी पिण्याची व्यवस्था देखील केली नसल्‍याची टीका
girish mahajan
girish mahajan

जळगाव : विरोधकांवर हल्लाबोल करताना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी पक्षात घराणेशाही राहिली आहे. या तिन्‍ही पक्षात त्यांच्या नेत्यांच्या घराण्यातील व्यक्तीशिवाय इतरांना संधी दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. तिन्‍ही पक्षात घराणेशाही असली तरी भाजपमध्‍ये मात्र कोणत्याही प्रकारची घराणेशाही नाही. तर तत्वावर चालणारा पक्ष असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. (jalgaon-news-bodwad-nagar-panchayat-election-girish-mahajan-target-mahavikas-aaghadi)

girish mahajan
जागतिक चहा दिन..टपरीवरचा कटींग ते अमृततुल्‍यचा कप; चहाची मजाच न्‍यारी

बोदवड नगर पंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला होत आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शक्तीप्रदर्शन करीत प्रचार नारळ फोडल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी सर्वच पक्ष वेगवेगळे लढत आहेत. यातील दहा जागांवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. हे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा भाजपकडून केला जात आहे.

चाळीस वर्ष सत्‍ता उपभागी तरी..

आपल्या भाषणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव न घेता त्यांनी चाळीस वर्ष या भागात सत्ता उपभोगलेल्‍या नेत्यांनी गावात साधी पाणी पिण्याची व्यवस्था देखील केली नसल्‍याची टीका करत भाजप निवडणूक आले तर एक वर्षात रोज पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे

भाजपला खिंडार पडण्याची शक्‍यता

मागील काळाचा विचार केला तर एकनाथ खडसे यांच्या मतदार संघात भाजपचा नेहमीच बालेकिल्ला राहिला होता. मात्र एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात गेल्यानंतर या ठिकाणी भाजपला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात असताना पुढील आठवड्यात बोदवड येथील नगरपचायतीची निवडणूक होत आहे.

तिनही नेत्‍यांची प्रतिष्‍ठा पणाला

निवडणूक भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बनली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या बोदवडमधील सत्‍ता भाजप कायम ठेवण्यासाठी गिरीश महाजन यांनीही आपली ताकद याठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला असून आज झालेल्या प्रचार नारळ शुभारंभप्रसंगी त्यांनी शक्तीप्रदर्शन करून विरोधकांच्या पुढे आव्हान उभे केल्याचे पाहायला मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल आणि नगराध्यक्ष भाजपचा होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com