वाळू वाहतूकीसाठी पैशांची मागणी; बोदवड तहसीलदारासह तिघे अडकले

वाळू वाहतूकीसाठी पैशांची मागणी; बोदवड तहसीलदारासह तिघे अडकले
Bribe
BribeSaam tv

जळगाव : अवैधरित्‍या वाळू वाहतुक करत असलेल्‍याकडून पैशांची मागणी केली. या प्रकरणात आठ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव (Jalgaon) एसीबीच्या जाळ्यात अडकले. (jalgaon news Bodwad tehsildar and three others were caught taking bribe)

Bribe
तीन महिन्‍यात हरविलेले महिला, बालक सापडले; मिसिंग डेस्क मोहिम

तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात होती. वाळूची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे (Jalgaon ACB) तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणीसाठी जळगावच्या लाचलुचपत विभागाने आज सापळा रचला होता.

तहसीलदार, तलाठीसह दोघे ताब्‍यात

वाळू वाहतुकदाराकडून पैसे घेत असताना बोदवडचे तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह तलाठी, वाहन चालक आणि एका खासगी पंटरला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आठ हजाराची लाच (Bribe) घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com