महिलांनी फोडल्‍या दारूच्‍या बाटल्‍या; ग्रामपंचायत हरली अन्‌ केला ठराव

महिलांनी फोडल्‍या दारूच्‍या बाटल्‍या; ग्रामपंचायत हरली अन्‌ केला ठराव
महिलांनी फोडल्‍या दारूच्‍या बाटल्‍या; ग्रामपंचायत हरली अन्‌ केला ठराव
Gram panchayat liquor Ban

जळगाव : गावागावात अवैध धंद्यांना उत आलेला आहे. गावठी दारू पाडून त्‍याचे दुकान चालविले जाते. ग्रामपंचाय, पोलिसही कारवाई करत नाही. यामुळे गावातील संतप्‍त महिलांनी दारूच्‍या बाटल्‍या ग्रामपंचायतीच्‍या कार्यालयासमोर फोडल्‍या. इतकेच नाही तर विक्री करण्याचा प्रयत्‍न झाला तर त्‍याच्‍यावही हल्‍ला चढविल्‍याचा निर्धार केला. (jalgaon-news-Bottles-of-liquor-thrown-by-women-in-front-of-the-Gram-Panchayat-wavdada)

Gram panchayat liquor Ban
रक्‍कम तपासून देतो म्‍हणून घेतले कार्ड; वृद्धाला गंडवत एटीएम कार्ड बदल

अनेक गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिस कारवाई करीत नसल्याचा नागरीकांचा प्रामुख्‍याने महिलांचा आरोप आहे.या दरम्‍यान वावडदा (ता. जळगाव) गाव परिसरात देखील अशाच प्रकारे गावठी दारू सट्टा पत्ता सुरू असल्याने अनेक तरुण याच्या आहारी जाऊन कुटुंब उद्‌ध्‍वस्त होत असल्याने गावातील महिलांनी आज रूद्रावतार धारण केला होता.

विक्री व पिणाऱ्यालाही इंगा दाखविणार

संतप्त महिलांनी व्यथा मांडताना दारू पिण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन नवरे पैसे मागतात. नाही दिले तर घरातील वस्तू, अन्न– धान्य विक्री करून दारू पितात. मजुरी करून आणलेले पैसेही जात असल्याने कुटुंबाचा उदार निर्वाह कसा करावा असा प्रश्न आहे. यामुळे आता गावात दारू अथवा अवैध धंदे चालू देणार नाही. गावात कोणी दारू विक्रीचा किंवा पिण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही इंगा दाखविल्या शिवाय राहणार नाही; अशी कडक भूमिका काही महिलांनी घेतली.

अखेर ग्रामपंचायतीने केला ठराव

संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून दारूच्या बाटल्या फोडून निषेध नोंदविला. शिवाय आता गावात कोणी दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला; तर त्याच्यावर हल्ला चढविल्याशिवाय राहणार नाही; असा निर्धार देखील महिलांनी यावेळी केला. महिलांचा हा संताप पाहता ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून गावात दारूबंदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com