धान्‍य खरेदी केले अन्‌ पैसेच दिले नाही; ७० शेतकऱ्यांची फसवणूक

३७ शेतकऱ्यांनी सुरवातीला खिर्डी बुद्रुक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रजीत पाटील, सरपंच गफुर कोळी, माजी पोलीस पाटील अरूण पाटील यांच्याकडे फसवणूकीबाबत अर्ज सादर केले. परिसरातील किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.
धान्‍य खरेदी केले अन्‌ पैसेच दिले नाही; ७० शेतकऱ्यांची फसवणूक

खिर्डी (जळगाव) : खिर्डी खु. येथील चार ते पाच व्यापाऱ्यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कपाशी, केळी मका, ज्वारी, गहु खरेदी करून घेतले. मात्र शेतकऱ्यांचे पैसेच दिले नसल्याचे उघड झाले आहे. यात काही शेतकरी राहिलेले पैसे मागण्यासाठी गेले असता व्यापाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. यात एकुण ७० शेतकऱ्यांचे कोटीच्या आसपास रक्‍कम व्यापाऱ्यांना देणे आहे. (jalgaon-news-bought-grain-did-not-pay-Fraud-of-70-farmers)

धान्‍य खरेदी केले अन्‌ पैसेच दिले नाही; ७० शेतकऱ्यांची फसवणूक
युवकाचा देशी जुगाड..कार धावते एक रूपयात ५० किमी

खिर्डी येथील तंटामुक्त समितीमार्फत शेतकऱ्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात पाच ते सहा व्यापाऱ्यांविरोधात तक्रार अर्ज सादर दिला आहे. या शेतकऱ्यांकडे दिलेल्या मालाच्या पावत्या व बँकेचे धनादेश आहे. यापुर्वी देखील भुसावळ येथील उद्योजिका सानिया कादरी यांनी तालुक्यातील ऐनपूर– निबोल येथील शेतकऱ्यांची केळी घेतली होती व त्यांच्या मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. धनादेश बँकेत वटत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना पुन्हा खिर्डी येथील काही व्यापाऱ्यांनी अशाच पद्धतीची फसवणूक झाल्याबाबत तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

३७ शेतकरी आले पुढे

सध्या तरी ३७ शेतकऱ्यांनी अर्ज दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र ६५ ते ७० शेतकरी अर्ज सादर करणार असल्याचे समजते. याबाबत ३७ शेतकऱ्यांनी सुरवातीला खिर्डी बुद्रुक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रजीत पाटील, सरपंच गफुर कोळी, माजी पोलीस पाटील अरूण पाटील यांच्याकडे फसवणूकीबाबत अर्ज सादर केले. परिसरातील किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्याबाबत वेळावेळी तंटामुक्त समितीने शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यात व्यापाऱ्यांकडे कोट्यावधीचा आकडा समोर आला आहे. यात शेतकरी व तंटामुक्त समिती यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना अर्ज सादर केले. शेतकऱ्यांसोबत पोलीसांनी बैठक घेवून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहेत

पाच व्‍यापारींची नावे तक्रार

खिर्डी खु. येथील शेतकर्‍यांची फसवणूक करणारे व्यापारी सुलेमान पिंजारी, इस्राईल पिंजारी, इस्माईल पिंजारी, जहांगीर पिंजारी, सुलतान शेख उर्फ नशीर यांची नावे शेतकरींकडून सांगितली जात आहेत. खिर्डी येथील व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिले असून, त्‍या व्यापाऱ्यांना बोलवून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्‍याचे निंभोरा पोलीस स्‍टेशनचे सपोनि स्वप्नील उनवणे यांनी सांगितले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com