Jalgaon: दोन हजाराची लाच; तहसिल कार्यालयातील शिपाई ताब्‍यात

दोन हजाराची लाच; तहसिल कार्यालयातील शिपाई ताब्‍यात
Jalgaon News Bribe
Jalgaon News BribeSaam tv

जळगाव : संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला (Bribe) लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे (Jalgaon News) महसुल विभागात खळबळ उडाली आहे. (Jalgaon News Two Thousand Bribe)

Jalgaon News Bribe
Nandurbar: मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांच्‍या टोळीचा हल्‍ला; ११ मेंढ्या फस्त

जळगाव (Jalgaon) तहसील कार्यालयातील शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघनगर जळगाव) हे संगायो योजनेचे फार्म जमा करतात. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. घटस्फोटीत व निराधार असलेल्‍या तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी (२७ जुलै) त्यांच्याकडे आईचे काम करून तीन हजार व तक्रारदाराचे काम करून दोन हजार रूपये मागितले होते.

सापळा रचत पकडले

आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी २ हजार रूपये मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार आज (२७ जुलै) दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिपाई मगन भोई याला लाच स्‍वीकारताना ताब्यात घेतले. तक्रारदार मुलगी व आईसोबत वास्तव्यास आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com