कैद्यास घरचे जेवण देण्यासाठी घेतली लाच; तुरूंग रक्षक एसीबीच्या जाळ्यात

कैद्यास घरचे जेवण देण्यासाठी घेतली लाच; तुरूंग रक्षक एसीबीच्या जाळ्यात
कैद्यास घरचे जेवण देण्यासाठी घेतली लाच; तुरूंग रक्षक एसीबीच्या जाळ्यात
bride

भुसावळ (जळगाव) : येथील दुय्यम कारागृहात असलेल्या कैद्यास घरच्या जेवणाचा डबा देण्याच्या मोबदल्यात कारागृहातील तुरूंग रक्षकानं दोन हजारांची मागणी केली. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकानं सापळा रचून तुरुंग रक्षकास रंगेहात अटक केली. या घटनेुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-bribe-taken-to-give-a-prisoner-a-home-cooked-meal-Prison-guards-in-ACB's-net)

bride
बालिकेच्‍या अंथरूणात दोन साप..गळ्यावर दंश केल्‍याने काही क्षणात मृत्‍यू

तक्रारदार यांच्या मुलावर गुन्हा दाखल असून तो, भुसावळातील दुय्यम कारागृहात आहे. त्याला जिल्हा कारागृह जळगाव येथे न पाठविण्यासाठी व जेलमध्ये त्याला घरचे जेवणाचा डबा देणे, भेटू देण्यासाठी व इतर सवलती देण्याच्या मोबदल्यात तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला.

दोन हजाराची लाच

दरम्‍यान आज (ता.१५) दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडून देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, काँन्स्टेबल प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com