
जळगाव : रेल्वे प्रवासातील तिकिटांचा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. तिकिट काढून देणारे दलाल वाढत आहेत. यात दुप्पटीच्या दरात तिकिटे विक्री करणाऱ्या एकाला पथकाने जळगाव (Jalgaon) रेल्वेस्थानकावर रंगेहाथ पकडले आहे. (Jalgaon News Railway Ticket Black Market)
रेल्वे (Railway) स्टेशनवरच तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक करण्यात आली आहे. तिकीट तपासणी करणाऱ्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने दलालाला अटक केली. एक व्यक्ती तिकीट खिडकीच्या परिसरात फिरून कन्फर्म तिकीटे जादा पैसे देऊन विक्री करत होता. तिकीट तपासणी पथकातील यांनी अटक केली.
साडेअकरा हजाराची तिकिट जप्त
संबंधीत दलालाकडून २ ऑक्टोंबर २०२२ ची जळगाव– सिंकदराबादची ४ कन्फर्म तिकीटे आणि जळगाव ते रामेश्वरची ४ नोव्हेंबरची चार तिकीटे जमा करण्यात आली. या कन्फर्म झालेल्या चारही तिकीटांची किंमत ११ हजार ४६० रूपये होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.