बिबट्याकडून वासराचा फडशा; अन्‍य एक वासरू गायब

बिबट्याकडून वासराचा फडशा; अन्‍य एक वासरू गायब
बिबट्याकडून वासराचा फडशा; अन्‍य एक वासरू गायब
leopards

मेहुणबारे (जळगाव) : लांबेवडगाव (ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याची भीतीने शेतकरी भयभीत झाले आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याचे दोन बछडे पाठोपाठ मादी बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली होती. ही मादी बिबट बछड्यांसह कुठे गेली याचा तपास नसतांना आज पुन्हा बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला आहे. तर याच शेतकऱ्याचे एक वासरू तीन चार दिवसापासून गायब आहे. मात्र बिबट्याने या वासरूची शिकार केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (jalgaon-news-chalisgaon-Calf-feathers-from-leopards-Another-calf-disappeared)

leopards
एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी; अंजनी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

लांबेवडगाव येथील छन्नुसिंग भगवान पाटील यांचे शेतात गुरे बांधलेली असतात. नेहमीप्रमाणे पाटील हे गुरूवारी सायंकाळी गुरांना चारापाणी करून घरी गेले. आज पहाटे दूध काढण्यासाठी शेतात गेले असता एक वासरू रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. या वासरूच्या नरडीजवळ व मागील पायाजवळ ओरबडल्याचे खुणा आढळून आल्या. बिबट्यानेच हा हल्ला केला असल्याची शंका असून शेतकऱ्यांने वन विभागाला माहिती दिल्यानंतर संजय चव्हाण व श्रीराम राजपूत यांनी पंचनामा केला.

अन्य एक वासरू गायब

दरम्यान तीन दिवसापूर्वीच छन्नुसिंग पाटील यांचे आणखी एक वासरू गायब आहे. या वासराचा पाटील यांनी आसपास शोध घेतला पण ते मिळून आले नाही. त्यामुळे बिबट्यानेच ते ओढून नेले असावे असा कयास लावला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com