कर्ज वसुलीच्‍या खोट्या नोंदी; ५१ लाखाचा अपहार उघडकीस

कर्ज वसुलीच्‍या खोट्या नोंदी; ५१ लाखाचा अपहार उघडकीस
fraud case
fraud case

दीपक कच्‍छवा

मेहुणबारे (जळगाव) : कर्ज वसुलीच्या खोट्या नोंदी करून पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सुमारे ५१ लाख २९ हजार ६१२ रूपये सत्तेचाळीस पैशांचा अपहार केल्याचा प्रकार लेखा परिक्षणात उघडकीस आला आहे. या अपहार प्रकरणी लेखा परिक्षक सहकारी संस्था भडगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे चेअरमनसह सचिव, संचालक व क्षेत्रिय बँक अधिकारी अशा १७ जणांवर मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-chalisgaon-fraud-case-False-records-of-debt-recovery)

लेखा परिक्षक सहकारी संस्था भडगाव योगेश वळवी यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८१(३)(क) नुसार पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे लेखा परिक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होते. वळवी यांनी या संस्थेचे लेखा परिक्षण केले असता लेखा परिक्षणात अफरातफर, गैरव्यवहार व गैरविनीयोग केल्याचे उघडकीस आले आहे. पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव, चेअरमन व संचालकांनी संस्था सभासदांना कर्ज येणे बाकी निरंकबाबत दाखले दिलेले, बेकायदेशीर परस्पर कर्ज वाटप दर्शवून रकमेचे चेक व विड्रालवर खोट्या आणि बनावट सह्या करून कर्ज रकमेची स्वत:चा फायदा संस्थेच्या कर्ज खतावणीला गिरवागिरव करून प्रत्यक्षात कर्ज वसुली रजिस्टर व रोजकिर्दला वसुल जमा न करता बँकेत प्रत्यक्ष चेक वटलेले असतांना चेक जमाबाबत खोट्या नोंदी केली. तसेच यात दर्शविलेली बोगस कर्ज वसुलीच्या खोट्या नोंदी करून येणे कर्ज बाक्या कमी किंवा शून्य रूपये असा २३ लाख २ हजार ३४३ रूपयांचा अपहार केला. तसेच खत दुकानात २ लाख ३३ हजार ४६० रूपयांची अफरातफर केली आहे. त्यानंतर सोसायटीची इमारत बांधकाम तसेच दुरूस्तीचे कामकाज झालेले नसतांना खर्चापोटी १ लाख ८ हजार रूपये ही रक्कम दर्शवून सदरची रक्कम स्वत:च्या आर्थिक लाभाकरीता वापरून सचिव, चेअरमन व संचालक मंडळ यांनी संस्थेचा रकमेचा अपहार केला.

fraud case
बीएचआर प्रकरण; आमदार चंदू पटेलांविरूद्ध अटक वॉरंट

खोट्या नोंदी करत दिशाभूल

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी व कर्जमुक्ती योजनांमध्ये प्रत्यक्षात वाटप नसलेल्या कर्ज रकमेच्या चुकीच्या व खोट्या नोंदी करून शासनाची दिशाभूल करून हेतुपुरस्कर समावेश केला. त्यापैकी शासनाकडून २० सभासदांची २ लाख ७१ हजार ८०० रूपये वजा जाता एकूण १४२ सभासदांची रक्कम मुद्दल १८ लाख ६८ हजार ८५० रूपये व व्याज रूपये ६ लाख १६ हजार ९५९ रूपये ४७ पैसे असे एकूण २४ लाख ८५ हजार ८०९ रूपये ४७ पैसे एवढी रक्कम शासनाची दिशाभूल सचिव पदाचा दुरूपयोग करून ती रक्कम शासनाकडून मिळवून ती शासनाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा टाकळी प्र.दे. ता.चाळीसगाव या बँकेत संस्थेच्या कर्ज खात्यात जमा करून ती रक्कम व त्यावरील व्याज शासनास परत करणे असतांना ती जमा केली नाही

पाच वर्ष चालला खेळ

आरोपीतांनी संगनमत करून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत बँक धोरणाच्या असलेल्या नियमांचे पालन न करता संस्थेचे २६ लाख ४३ हजार ८०३ रूपये व शासनाचे २४ लाख ८५ हजार ८०९ रूपये ४७ पैसे असे एकूण ५१ लाख २९ हजार ६१२ रूपये ४७ पैसे या रकमेचा अपहार केला. यामुळे बँकेचे संचालक वासुदेव माळी, दिगंबर पाटील, कैलास चौधरी, प्रकाश माळी, बेबाबाई माळी, शेनपडू पाटील, एकनाथ पाटील, चिंतामण अहिरे, दयाराम माळी, लक्ष्मण माळी, सखाराम तिरमली, सुकदेव पाटील, शोभा पाटील, रामचंद्र पाटील तसेच आर. एल. वाघ, बी. पी. साळुंखे व डी. यू. पवार अशा १७ जणांच्या विरोधात मेहूणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com