गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक

गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक
गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक
Cylinder BlastSaam tv

चाळीसगाव (जळगाव) : सांगवी (ता. चाळीसगाव) येथील एका ऊसतोड मजुराच्या घरात अचानक गॅसचा स्फोट झाला. यात रोकडसह एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाले आहेत. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही. (jalgaon news chalisgaon gas cylinder Burn three lakh items)

Cylinder Blast
बंद पडलेल्या रुग्णवाहिकेला धक्का देऊन पोहंचवले रुग्णालयात

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील सांगवी येथील दामु फंदु राठोड हा ऊसतोड मजूर असून मजूरी करून कुटुंबाचा उपनिर्वाह भागवत होता. राठोड हे नुकताच ऊसतोडणी करून घरी परतले आहेत. त्यांच्या पत्नी आज (११ मे) सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट (Cylinder Blast) झाला. यावेळी घरातील संसार उपयोगी वस्‍तूंचा कोळसा झाला.

सोने, रोख रक्‍कम, धान्‍य जळाले

सिलेंडरच्‍या स्‍फोटात ५ ग्रॅम सोने, बाजरीचे धान्य, बैलांची विक्री करून कपाटात ठेवलेले १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाले. बुधवार, ११ रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत (Jalgaon News) आहे. या घटनेमुळे शेजारील धनंजय ठाकरे यांच्याही घराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आले आहे. तत्पूर्वी राठोड कुटुंबाचे संसार पूर्णतः उद्धवस्त झाला आहे. मदतीची आस धरून बसलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com