जीव वाचविण्यासाठी नातूला घेवून झाडावर; सकाळ झाली, पाणी ओसरले अन्‌

जीव वाचविण्यासाठी नातूला घेवून झाडावर; सकाळ झाली, पाणी आसरले अन्‌
जीव वाचविण्यासाठी नातूला घेवून झाडावर; सकाळ झाली, पाणी ओसरले अन्‌

जळगाव : चाळीसगाव तालुका परिसरात ढगफुटी सदृश्‍य पावसाने हाहाकार माजविला. अचानक उद्‌भवलेल्‍या या परिस्‍थीतीने प्रत्‍येकाला जीव वाचवायची पडली होती. अशात चाळीत नातूला घेवून झोपलेल्‍या आजोबा नातूसोबत जीव वाचविण्यासाठी झाडावर चढले. मध्‍यरात्रीनंतरचा हा थरार त्‍यांच्‍या आयुष्‍यासाठी शेवटचाच म्‍हणावा लागेल. (jalgaon-news-chalisgaon-heavy-rain-parson-Taking-a-grandson-to-a-tree-to-save-life)

अचानक संकट आले तर काय करावे सुचत नाही. असेच संकट चाळीसगाव तालुक्‍यातील नागरीकांवर ओढवली. सोमवारच्‍या मध्‍यरात्रीनंतर झालेल्‍‍या ढगफुटी सदृश्‍य पावसाने जनजीवन विस्‍कळीत झाले. अगदी रात्री साडेअकरा बाराच्‍या सुमारास ओढवलेल्‍या संकटामुळे तेथील नागरीकांनी रात्र अगदी जागूनच काढली. दुसऱ्या दिवसाची रात्र देखील त्‍यांच्‍यासाठी वेगळी नव्‍हती. अशाच संकटात अर्थात नदीच्‍या पुरात अडकलेले वालझेरी येथील वासुदेव सुर्यवंशी हे त्‍यांचा नातू साईला घेत रात्र झाडावर बसून काढली.

दोन तासातच नदी ओव्‍हरफ्लो

चाळीसगाव तालुक्‍यात ढगफुटी झाली. यामुळे सर्व नद्या, उपनद्या व नाल्‍यांना पाणी आले होते. यात डोंगरी नदीला देखील कधी नव्‍हे तो पूर आला होता. पाऊस सुरू झाल्‍यानंतर केवळ दोन तासातच डोंगरी नदी ओव्‍हरफ्लो होवून वाहत होती. याची साधी कल्‍पना देखील केली नसल्‍याचे वासुदेव सुर्यवंशी यांनी सांगितले.

जीव वाचविण्यासाठी नातूला घेवून झाडावर; सकाळ झाली, पाणी ओसरले अन्‌
गावकऱ्यांच्‍या मदतीने गायीला जीवदान; पाय घसरून पडली पाचशे मीटर खाली दरीत

छाती इतक्‍या पाण्यात उतरले

डोंगरी नदीला पाणी आल्‍याने ते पाणी वासुदेव सुर्यवंशी झोपले असलेल्‍या चाळीत शिरले. तेथून घरी जाणे शक्‍य नव्‍हते. मात्र जीव वाचविणे देखील महत्‍त्‍वाचे होते. याकरीता वासुदेव सुर्यवंशी यांनी नाते साईला खांद्यावर बसवून छाती इतक्‍या पाण्यातून मार्ग काढण्यास सुरवात केली.

सकाळ होईपर्यंत झाडावर बसले

रात्री दोनच्‍या सुमारास छाती इतक्‍या पाण्यातून मार्ग काढत जवळच असलेल्‍या लिंबाच्‍या झाडापर्यंत सुर्यवंशी नातूला घेवून पोहचले. अगोदर साई यास झाडावर चढविले. यानंतर स्‍वतः झाडावर चढले. रात्रीच्‍या अंधारात काहीच दिसत नव्‍हते. जिकडे तिकडे केवळ पाणी होते. वासुदेव सुर्यवंशी हे नातूला जवळ घेत झाडाच्‍या फांदीवर बसून राहिले. पहाटे साडेपाच सहाच्‍या सुमारास थोडा उजेड पडला. यावेळी नदीचा पूर देखील काहीसा ओसरला होता. यानंतर ते खाली उतरून घरी पोहचले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com