पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून; २० लाखाचे नुकसान

पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून; २० लाखाचे नुकसान
पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून; २० लाखाचे नुकसान

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुका परिसरात अचानक आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात पिंपरखेड येथे शेतात बांधलेले पोल्ट्री फार्मचा शेडच वाहून गेल्‍याने यात सुमारे दहा हजार कोंबड्या वाहून गेल्‍या आहेत. (jalgaon-news-chalisgaon-heavy-rain-The-flood-carried-ten-thousand-hens-Loss-of-Rs-20-lakh)

चाळीसगाव तालुका परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाला. यामुळे शेतात व गावांमध्‍ये पाणी शिरले. यात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात पिंपरखेड येथील वसंतराव मोरे यांनी शेतात पोल्‍ट्री फार्मचे दोन शेड उभारलेले होते. हे दोन्‍ही शेड पुरात वाहून गेल्‍याने मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्व कोंबड्या गेल्या वाहून

दोन पोल्‍ट्री फार्मच्‍या शेडमध्‍ये दहा कोंबड्या होत्‍या. परंतु, पुराच्‍या पाण्यात शेडसह दहा कोंबड्या वाहून गेल्‍याचे मोरे यांनी सांगितले.

पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून; २० लाखाचे नुकसान
जीव वाचविण्यासाठी नातूला घेवून झाडावर; सकाळ झाली, पाणी आसरले अन्‌

वीस लाखाचे नुकसान

मोरे यांचे पिंपरखेड शिवारातील शेतात असलेल्‍या शेडच्या भिंती पडल्या आहेत. तसेच पत्रे उडून गेली आहेत. शिवाय केलेली पाईप लाईन देखील पुरात वाहून गेली आहे. तसेच शेडमध्‍ये असलेल्‍या कोंबड्या पुरात वाहून गेल्‍याने जवळपास २० लाखाचे नुकसान झाले आहे. शासनाने या शेडमधील झालेल्या नुकसानीच्या पंचनामा करून भरवाई द्यावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com