वरच्‍यावर पाहणी अन्‌ प्रत्‍येक नुकसानाच्‍या भरपाईची हमी; राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले अन्‌ गेले

वरच्‍यावर पाहणी अन्‌ प्रत्‍येक नुकसानाच्‍या भरपाईची हमी; राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले अन्‌ गेले
वरच्‍यावर पाहणी अन्‌ प्रत्‍येक नुकसानाच्‍या भरपाईची हमी; राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले अन्‌ गेले
अब्‍दुल सत्‍तार

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी व महापुर येवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार यांनी आज आज करत पूरग्रस्त व बळीराजाला धीर दिला. तसेच पुरामुळे झालेल्‍या प्रत्‍येक नुकसानाची भरपाई सरकार देणार असल्‍याची हमी सत्‍तार यांनी यावेळी बोलताना दिली. परंतु, नुकसान झालेल्‍या भागाच्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष न जाता वरच्‍यावर पाहणी करून राज्‍यमंत्री निघून गेल्‍याने शेतकऱ्यांनी रोष व्‍यक्‍त केला. (jalgaon-news-chalisgaon-Minister-of-State-Abdul-Sattar-came-and-went-Inspection-of-Chalisgaon-flood-affected-area)

चाळीसगाव तालुका व परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने शेतातील पिकांसह घर, दुकानांचे मोठे नुकसान झाले. तसेच काहींचे गुरे देखील पुरात वाहून गेली आहे. या सर्व नुकसानग्रस्‍त भागाची पाहणी करण्यासाठी अब्‍दुल सत्‍तार यांनी औरंगाबादनंतर चाळीसगाव तालुक्‍यात आले होते. त्‍यांनी सर्व नुकसानीच्‍या भागाची पाहणी करत नुकसानीची भरवाई देण्याचे आश्‍वासन दिले.

राज्‍यमंत्री आले अन्‌ गेले

चाळीसगाव शहरासह अनेक गाव पुराने वेढले गेले होते. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार चाळीसगाव तालुक्‍यात आले. मात्र त्‍यांनी काही वेळ थांबत वरच्‍यावर पाहणी करून लागलीच परतले. त्‍यांनी नुकसानग्रस्‍त शेतकऱ्याशी देखील संवाद न साधताच निघून गेल्‍याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी व नागरीकांनी याबाबत रोष व्‍यक्‍त केला आहे.

अब्‍दुल सत्‍तार
पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून; २० लाखाचे नुकसान

भरपाई मिळणार याची गॅरंटी : सत्‍तार

नुकसान झालेल्‍या प्रत्‍येक ठिकाणी शासकिय यंत्रणा पोहचेल असे होत नाही. या नुकसानीची पाहणी करून तीन– चार दिवसात पंचनामे पुर्ण करून सरकारकडे आल्‍यानंतर नुकसान भरपाईची घोषणा मुख्‍यमंत्री करतील. पुरात अनेकांचे घरांच्‍या नुकसान झाले, शेतातील पिके वाहून गेली आहेत. तर अनेकांच्‍या गुरे वाहून गेली. दुकानांचे नुकसान झाले. याचे सर्व पंचनामे करून प्रत्‍येक नुकसानाची भरपाई सरकार देणार अशी हमी अब्‍दुल सत्‍तार यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com