रस्‍त्‍यावरील खड्डे रांगोळीने रेखाटले; झाडे लावून राष्‍ट्रवादीचे आंदोलन
Chalisgaon ncp

रस्‍त्‍यावरील खड्डे रांगोळीने रेखाटले; झाडे लावून राष्‍ट्रवादीचे आंदोलन

रस्‍त्‍यावरील खड्डे रांगोळीने रेखाटले; झाडे लावून राष्‍ट्रवादीचे आंदोलन

चाळीसगाव (जळगाव) : शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खड्ड्यांना रांगोळीने सजवून त्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (jalgaon-chalisgaon-nagar-palika-pits-on-the-road-were-lined-with-rangoli-Nationalist-movement-by-planting-trees)

चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमूळे नगरपालिका प्रशासनाविरोधात तहसील कचेरी येथे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. गेल्‍या चार वर्षांपासून शहरातील रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे. खरजई नाका ते दयानंद हॉटेलपर्यंत गेल्या वर्षी रस्ता करण्यात आला होता. परंतु एकाच वर्षात रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. तसेच सिग्नल पॉईंट ते कचेरीपर्यंत सुद्धा चालणे अवघड झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने तर गेंड्याच्या कातडीचे स्वरूप घेतले आहे. गेली चार वर्ष शहरातील नागरीक व व्यापारी हे सहन करीत आहेत. फक्त कागदावरच नगरपालिकेचा कारभार पाहावयास मिळतो आहे आता तरी प्रशासनाला जाग येईल का?

Chalisgaon ncp
कृषिमंत्री दादा भुसेंच्या संवेदनशीलतेचे दर्शन; शेतकऱ्यांना दिले स्टेजवर स्‍थान

खड्ड्यांभोवती रांगोळी

चाळीसगाव शहरातील रस्ते हे अतिशय खड्डेमय झालेले असतांना सामान्य जनतेला मणक्याचे व पाठीचा त्रास चालू झाला आहे. महिलांना तर गाडी चालवणे हे अतीशय कठीण झाले आहे. सिग्नल चौक पासून ते घाट रोड जाण्यासाठी अर्धा तास लागतो. खड्यामुळे कायम ट्राफिक जाम असते. त्रस्त नागरीकांच्‍यावतीने आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अनिल देशमुख, शहरविकास आघाडीतर्फे खड्ड्यांभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली. तसेच कचेरी ते सिग्नल व गणेश रोडवर रॅली काढण्यात आली. यावेळी जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्‍हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्‍ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष सोनल साळुंखे, शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक भगवान पाटील, पं.स. सभापती अजय पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदाशिव गवळी आदी उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com