चाळीसगावात मिळून आला डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश

चाळीसगावात मिळून आला डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश
चाळीसगावात मिळून आला डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश
Ambedkar's ossuary

चाळीसगाव (जळगाव) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु असताना खोदकाम करतेवेळी पुतळ्याच्या सुमारे दहा फूट खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश मिळून आला. या अस्थिकलशाचे पावित्र्य जपत तो पुन्हा नवीन पुतळ्याच्या ठिकाणी होता तसा ठेवण्यात येणार आहे. (jalgaon-news-chalisgaon-palika-work-babasaheb-ambedkar-statue-renovation-and-Ambedkar's-ossuary)

यासंदर्भात अधिक माहिती देताना समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागूल यांनी सांगितले, की नगरसेविका सायली जाधव व रोशन जाधव यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालिकेच्या माध्यमातून सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पुतळा होता; त्या पुतळ्याच्या ठिकाणी खोदकामादरम्यान अस्थिकलश मिळून आला.

Ambedkar's ossuary
जलयुक्‍त योजना सुरू ठेवण्याऐवजी आघाडी सरकारकडून चौकशीचे अडथळे : माजी मंत्री बावनकुळे

चाळीसगावात आणल्या होत्‍या अस्‍थी

ज्या विषयी आपले वडील स्वातंत्र्य सैनिक स्व. भगवान शंकर बागूल यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या दस्तावेजानुसार तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यानंतर मुंबईत ९ डिसेंबरला चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि १० डिसेंबरला त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या हजारो लोकांनी मुंडण केले. ज्यात चाळीसगावचे कट्टर आंबेडकरी नेते श्‍यामाजी जाधव, दिवाण चव्हाण यांच्यासह डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी भैय्यासाहेबांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी कलशात चाळीसगावला आणल्या. १९५८ साली जेव्हा हा पुतळ्या उभारण्यात आला, त्यावेळी त्यांनी हा अस्थिकलश पुतळ्याखाली ठेवला होता. तो आज खोदकाम करताना मिळून आला. तो पुन्हा पूर्वी होता तसा नवीन पुतळ्याखाली ठेवून आमच्या पूर्वजांचा हा वारसा जपणार असल्याचे बागूल यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अस्थिकलशाची माहिती समजताच तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन या विषयीची माहिती जाणून घेतली. अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com