अल्पवयीन मुलीस दोघांनी फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीस दोघांनी फूस लावून पळविले
अल्पवयीन मुलीस दोघांनी फूस लावून पळविले
Crime NewsSaam tv

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचा राग येऊन दोघांनी मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी चाळीसगाव (Chalisgaon) ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (jalgaon news chalisgaon two lured the minor girl away)

Crime News
राष्ट्रवादीने हवेत सोडले काळे फुगे; अग्निपथ योजनेविरोधात धुळ्यात आंदोलन

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी घोडेगाव येथून विवाहासाठी (Marriage) स्थळ आला. सदर गोष्ट वर्षभर चालली. मात्र सदर स्थळ मुलीच्या वडिलाला आवडला नाही. म्हणून त्यांनी समोरच्या भावी वराला वारंवार नकार दिला. याचाच राग आल्याने भावी वरासह एकाने माझ्या मुलीला पळवून नेले असावे असा संशय आहे.

दोघांवर गुन्‍हा दाखल

पीडितेच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण (police) पोलिस स्थानक गाठून संशयित आरोपी जगन परशराम राठोड व मनेश धनराज राठोड (दोन्ही रा. घोडेगाव ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com