मोबाईल क्रमांक बदलून आमदारांची कार परिवहन मंत्र्यांच्‍या नावे; तिघांना पोलिस कोठडी

मोबाईल क्रमांक बदलून आमदारांची कार परिवहन मंत्र्यांच्‍या नावे; तिघांना पोलिस कोठडी
Jalgaon RTO
Jalgaon RTOsaam tv

जळगाव : जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर ट्रान्स्फर केल्याच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी अटक केलेल्या तीन एजंटांना दोन दिवसांची पोलिस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक विठ्ठल पाटील (जळगाव), प्रशांत ऊर्फ पप्पू भोळे व अकील शेख रहेमान शेख (रा. भुसावळ) या तिघांना गुरुवारी (ता. २०) न्यायालयात हजर केले होते. (jalgaon news Changing mobile number of MLAs cars in the name of Transport Minister)

Jalgaon RTO
BSNL: 'बीएसएनएल’चे सीम ‘ॲक्टिव्हेट’ होईना; कार्यालयाचे हात वर

दोन दिवसांपूर्वीच कनिष्ठ लेखापरीक्षक जवाहरलाल भानुदास कुलकर्णी, कनिष्ठ लिपिक गणेश देवरे, सुनील ऊर्फ संदीप पाटील व मनोज पाटील यांना दोषी ठरवून परिवहन आयुक्तांनी निलंबित केले होते. कार ट्रान्स्फर करताना ज्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी गेला होता. तो क्रमांक अशोक पाटील यांचा होता, तर पप्पू भोळे याने या मोबाईलचा वापर केला होता. अकील शेख रहेमान शेख याने पैसे ट्रान्स्फर केले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

अशी केली कार ट्रान्स्फर

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, अज्ञात इसमाने २१ ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान परिवहन विभागाचे www.parivahan.gov.in या पोर्टलद्वारे परिवहन वुड्स मेहरूण विभागाचे डेटाबेसमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांचे मालकीची टोयटा कंपनीची इनोव्हा (एमएच१९-सीझेड ५१३०) याच्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक ९३२५२५२२११ हा बदलुन तो मो.क्रं. ७७९८२१७७७६ असा केला. त्यानंतर सदर वाहन हे अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांचे नावे करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला व सदर ऑनलाइन अर्जाचे प्रिंटआऊटवर विक्रेता म्हणून आमदार संजय सावकारे यांची व खरेदीदार म्हणून अनिल दत्तात्रय परब यांची बनावट सही करून सदर बनावट कागदपत्रे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव (Jalgaon RTO) येथे सादर करून सदर वाहन हे अनिल दत्तात्रय परब यांचे नावे हस्तांतरित करून संजय सावकारे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

असा घेतला शोध

या गुन्ह्याचे तपासात जळगाव पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी व अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आवश्यक माहीती संबधीत बँकेशी पत्रव्यवहार करून प्राप्त माहीतीचे बारकाईने विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी व त्यांचा ठावठिकाणा निष्पन्न केला. गुन्हयाचे तपासकामी व संशयितांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेकामी सहा पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांच्यासोबत सहायक फौजदार बाळकृष्ण पाटील, हेड कॉन्सटेबल राजेश चौधरी, प्रविण वाघ, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, संदीप नन्नवरे, अरविंद वानखेडे, पंकज वराडे यांचे पथक तयार करून त्यांना जळगाव आरटीओ कार्यालय परीसर येथे रवाना करण्यात आले होते.

तीन दलालांना अटक

तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांसाठी आरटीओ कार्यालयच्या परीसरात संबंधित पोलिस पथकाने सापळा रचुन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ०३ मोबाईल व गुन्ह्यासंबधीत कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहे. संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने २ दिवसांची पोलीस कोठड़ी सुनावण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com