Fire: भुसावळात केमिकल फॅक्टरी भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

भुसावळात केमिकल फॅक्टरी भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान
Fire
Firesaam tv

भुसावळ (जळगाव) : शहरापासून जवळच असलेल्या खडका एमआयडीसी परीसरात केमिकल फॅक्टरीला आज (११ जानेवारी) सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. फॅक्टरीतून मोठ्या प्रमाणावर आगीचे (Fire) लोट बाहेर पडू लागताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. आगीची भिषणता इतकी होती की, यात संपूर्ण फॅक्टरीतील सर्व साहित्य जळून खाक झालंय.

Fire
Jalgaon: एकाच दिवसात पारा ६ अंशांनी घसरला

भुसावळ (Bhusawal) शहरापासून जवळच असलेल्या खडका एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरी आहे. या फॅक्‍टरीतून सकाळी अचानक मोठ्या प्रमाणत धुराचे लोट बाहेर पडू लागले. यावेळी परिसरातील नागरिकांनी लागलीच धाव घेऊन अग्नीशमन दलास माहिती दिली. यानंतर दीपनगर व भुसावळ नगरपालिकेच्या (Bhusawal Nagarpalika) अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

आगीचे कारण अस्पष्ट

आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. माहितीनुसार रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील (Jalgaon) व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com