
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करायला आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला, शिवतीर्थावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) चांगलं बोलायचे म्हणून त्यांचे भाषण बंद केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केला. या उद्घाटन सोहळ्यासाठी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि उदय सामंत, शहाजीबापू पाटील यांच्यासह भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, आपण प्रचंड प्रेम दिलं, काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळालं. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि भाजपमुळे हे यश मिळालं. फक्त अडीच महिन्यात आम्ही एवढं यश मिळालं, ये तो झाकी है; असं मुख्यमंत्री म्हणताच, 'ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है;' असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
पाहा व्हिडीओ -
तसंच राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय, हे मी वारंवार सांगत होतो, मात्र, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली.
ते पुढे म्हणाले, युतीमध्ये निवडणूक लढवली, नंतर काय झालं? मग गद्दार कोण? अडीच वर्षात आमदार, खासदारांची जेवढी कामं झाली नाहीत, तेवढी फक्त अडीच महिन्यात केलीत. त्यामुळे आता ते घाबरलेत, कारण एकनाथ शिंदे गणपतीसह सर्व ठिकाणी फिरतोय, माझ्यामुळे त्यांना फिरावं लागतय, माझ्यामुळे गणपतीचं दर्शनाला जावं लागतं होतं, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. तसंच आपलं सरकार, एसटी कर्मचाऱ्यांसह, जळगावकरांचे प्रश्न सोडविणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
गुलाबराव शिवसेनेचा ढाण्या वाघ असून शिवतीर्थावर गुलाबराव यांचं भाषण चांगलं व्हायचं म्हणून ते बंद करण्यात आलं. पण, गुलाबराव मी कद्रू मनाचा नाही, हा एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे. गुलाबराव पाटील यांना पान टपरीवाला म्हटले,कोणाला हिंणवण्याचे काम करू नये. मी शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालो हे चालत नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आम्ही दोन वर्षात एवढं काम करू की औषधला सुद्धा कोणी शिल्लक राहिल की नाही हे सांगत येत नाही. कोणी गोमूत्र शिंपडतो आहे. हे तेवढेच शिल्लक राहतील, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचे आहे. आम्ही निवडणूक बघून काम करत नाही.
आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय आज आमची संख्या १७० च्या वर गेली असून यामध्ये आणखी ३० वाढवायचे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत. शिवाय तुमचे प्रश्न शिवसेना-भाजप युतीचं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन देत, गुलाबराव पाटलांनी कोणतेही खोके घेतलेले नाही त्यांना खोके घेण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.