चाइल्ड पोर्नोग्राफी..धानोरा, शिरपूरचे तरूण जाळ्यात

चाइल्ड पोर्नोग्राफी..धानोरा, शिरपूरचे तरूण जाळ्यात
चाइल्ड पोर्नोग्राफी..धानोरा, शिरपूरचे तरूण जाळ्यात
Child pornography

जळगाव : बाल लैंगिक अत्याचाराचा ऑन लाईन चालणारा धंदा अर्थात्‌ चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने देशभरात सलग दोन दिवस विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यात, धानोरा (ता. चोपडा) येथील एका तरुणाला नोटीस बजावली असुन, शिरपुर (ता. धुळे) येथील ग्रामिण भागातील आणखी एक तरुण जाळ्यात अडकला आहे. (jalgaon-news-Child-pornography-matter-Dhanora-and-Shirpur-youth-arrested-cbi)

Child pornography
मोदींनी माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण; धैर्याचा विजय : मुंडे

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने सलग दोन दिवस ८३ जणांविरूद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर १६ नोव्हेंबरला देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली होती. परंतु, सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील एफआयआर सेक्शनमध्ये गुरूवारी (ता. १८) गुन्ह्याची प्रथम खबरी रिपोर्ट (एफआयआर) टाकण्यात आली आहे.

दोन तरुणांचा उल्लेख

सीबीआयच्या साईटवर अपलोड केलेल्या एफआयआरनुसार धानोरा (ता. चोपडा) येथील दीपक नारायण पाटील तसेच, जोड्या-सांगवी (ता. शिरपुर, धुळे) येथील राहुल भटा पावरा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम- ६७ बी मध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत शिक्षेची तरतूद आहे. परंतु या गुन्ह्यात जिल्ह्यातील दोन्ही युवकांचा नेमका काय सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

बीएसएस्‍सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी

स्थानिक पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटीस बजावण्यात आलेला दीपक पाटील हा बीएसएसी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. नोटीसनुसार तो नागपूरला चौकशीसाठी हजर होणार असून, त्याने थोडी मुदत मागून घेतली असल्याचेही समोर आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईलच्या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचे कारण सांगून काही लोकांनी धानोरा येथे एकाची चौकशी करत नोटीस बजावली होती. त्यांनी नागपूर येथील गुप्तचर यंत्रणांकडून आले असल्याची बतावणी केली होती. एफआयआरनुसार तब्बल ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com