इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

चोपडा (जळगाव) : महागाई व इंधन दरवाढीविरोधात भाजप प्रणित केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस सेवा दलातर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या जनशिक्षण संस्थान येथून सायकल रॅली व ‘दे धक्का’ आंदोलनास सुरवात करण्यात आली. (jalgaon-news-chopda-Congress-cycle-rally-against-fuel-price-hike)

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
जवान निलेश सोनवणे अनंतात विलीन; मुळगावी अंत्‍यसंस्‍कार

राष्‍ट्रीय कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेली सायकल रॅली स्वस्तिक टॉकीज, धनगर गल्ली, गुजराथी गल्ली, रथगल्ली, मेन रोड, बाजार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानकावरून लोहाणा पेट्रोलपंपावर रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले. या रॅलीत जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस अजबराव पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, शेतकरी काँग्रेस सेलचे शशिकांत साळुंखे, प्रदेश सचिव एनएसयूआयचे चेतन बाविस्कर, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, युवक कॉंग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, अशोक साळुंखे, रमाकांत सोनवणे, प्रदीप पाटील, मधुकर बाविस्कर, रमेश शिंदे, दत्तात्रेय पवार, गोपाल बडगुजर, देविदास साळुंखे, प्रा. संदीप पाटील, प्रा. शैलेश वाघ, मुकेश पाटील, वैभव कांबळे, शेख रज्जाक, सुमीत पाटील, मनोर पाटील, प्रवीण पाटील, सुनील बागूल, अभिजित साळुंखे, भूषण पाटील, सोहन सोनवणे, हर्षवर्धन पवार, नंदलाल शिंदे, निवृत्‍ती भागवत पाटील आदी उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com