
जळगाव : चोपडा आगारातील वाहकाचा कारणे दाखवा नोटीसी बजावली. या नोटीसीच्या धास्तीने हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. या वाहकाच्या मृत्यूला महामंडळ प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप संतप्त संपकरी एसटी (St Strike) कर्मचाऱ्यांनी केला आहे. (jalgaon news chopda depo ST employee die of heart attack cause push of notice)
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा (St Employee) मागील दोन महिन्यांपासून संप सुरू आहे. संपकरी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासाठी लढा सुरू आहे. परंतु तोडगा न निघाल्याने प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, निलंबन, कारणे दाखवा नोटीस देत बडतर्फीची कारवाई केली जात आहे. अशाच कारणे दाखवा व भरपाईच्या नोटीसीचा धसका घेतल्याने चोपडा (Chopda) आगारातील वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एसटी संपकरी कर्मचार्यांकडून राज्य शासन व प्रशासनाचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली.
पोस्टाद्वारे नोटीस पाठविली अन्
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील राजाराम खंडू वळुजवाणी (वय ५६) यांना चोपडा एसटी आगार व्यवस्थापकांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. वळुंजवाणी यांना पोस्टाद्वारे सोमवारी (१० जानेवारी) नोटीस मिळाली. आवेदन कार्यपद्धती अंतर्गत कारवाई करण्याबाबतची ही नोटीस वाचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल केले. परंतु, दुसऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने चहार्डीसह चोपडा आगार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नोटीसनेच घात झाला असल्याची त्यांच्या परिवाराची भावना असून संताप व्यक्त होत आहे. वाहकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.