Breaking चोपडा शिवारात हेलिकॉप्‍टर कोसळले

दिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्‍टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्‍थळी पोहचत आहेत.
Breaking चोपडा शिवारात हेलिकॉप्‍टर कोसळले
Helicopter crashHelicopter crash

राजेश सोनवणे

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात दोन जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.

चोपडा तालुक्‍यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्‍या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्‍टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्‍पष्‍ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्‍टर असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात दोन जणांचा मृत्‍यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्‍टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्‍थळी पोहचत आहेत.

दाट जंगल परिसर

सदर घटना घडली हा परिसर सातपुडा पर्वत रांगेत असून, घनदाट जंगलाचा परिसर आहे. घटनास्‍थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्‍याने प्रशासनाची देखील तात्‍काळ मदत मिळणे कठीण आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com