मन्याड धरणक्षेत्रात ढगफुटी सदृश्‍य पाऊस; महापुरात वाहिल्‍या संसारपयोगी वस्‍तू

मन्याड धरणक्षेत्रात ढगफुटी सदृश्‍य पाऊस; महापुरात वाहिल्‍या संसारपयोगी वस्‍तू
Heavy Rain
Heavy Rain

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात पावसाने मोठे थैमान घातले असुन मेहुणबारे (ता. चाळीसगाव) यासह अनेक भागात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तालुक्यातील मन्याड धरण क्षेत्रात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गिरणा नदीला महापूर आला आहे. मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून जवळपास रात्रीच सत्तर हजार क्युसेस पाणी सुरु होते. आता या पाण्याचा पुर ओसरत आहे. पुराच्या पाण्याखाली गँसच्या हंड्या व संसारउपयोगी वस्तू देखील वाहतांना दिसल्याचे प्रत्यदर्शनी यांनी सांगितले. (jalgaon-news-Cloudy-rain-in-Manyad-dam-area-chalisgaon-taluka-heavy-rain)

ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने वरखेडे– मेहुणबारे रस्‍त्यावर असलेल्या तिरपोळे येथे नाल्याला पाणी आले आहे. यामुळे रात्री दहा वाजेपासुन संपर्क तुटला होता. आज सकाळी चाळीसगाव येथे जाणारी बस पाण्याअभावी सकाळी सात वाजेपासुन अडकुन आहे.

गिरणेला प्रथमच महापूर

मन्याड धरणक्षेत्रात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने धरणातुन सध्या ४१ हजार क्युसेक्स पाणी गिरणा नदी पात्रत येत आहे. यामुळे गिरणा नदीला महापूर आला असून प्रशासन अलर्ट जारी केले आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy Rain
पूरग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्या युवकाचा मृत्यू; एका चिमुकलीसह 5 जण गेले वाहून

तितूर, डोंगरीला पूर

तितूर, डोंगरी नदीला आलेल्या महापुराने मोठे थैमान घातले आहे. दोन दिवसांपासून डोंगर भागात मुसळधार पाऊस होत असल्याने या नद्यांना पूर आला आहे. चाळीसगाव शहरातील नदी काठच्या अनेक भागात पुराचे पाणी शिरले. तितूर डोंगरी नदीच्या पाण्याच्या पातळीवर प्रशासनाने लक्ष ठेवले असुन नागरिकांना नदीकाठच्या भागात जावु नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com