एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल; खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास

एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल; खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास
एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल; खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास
St Strike

पारोळा (जळगाव) : गेल्या सतरा- अठरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसह विलगीकरणासाठी संप पुकारला आहे. यामुळे एसटीची चाके थांबली आहेत. परिणामी ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण (Education) घेण्यासाठी खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

St Strike
प्रवासी वाहतुकीवरून मारहाण; खासगी बस वाहकाचा मृत्यू

दोन वर्षापासून कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू होते. मात्र परिस्थिती हळूहळू सुधारल्याने शासनाने महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र मागील अठरा दिवसांपासून एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्या वाहनातून प्रवास करून शिक्षण पूर्ण करावे लागत आहे. त्यातच ग्रामीण भागात प्रवासी नसल्याने खाजगी वाहन देखील पूर्ण भरेपर्यंत मार्गक्रमण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. वेळेवर महाविद्यालयात पोहचता येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पुर्ण करावे लागत आहे. खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पास काढलेली जातेय वाया

याबाबत शासनाने तोडगा काढून एसटी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी पूर्ण महिन्याची एसटीची पास काढल्या आहेत. त्यामुळे हजारो रुपये विद्यार्थ्यांचे प्रवासविना वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढीमुळे खाजगी वाहतूक भाड्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मानसिक त्रासा बरोबर आर्थिक भुर्दंड देखील भरावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com