‘आरटीई’ प्रवेशासाठी वयोमर्यादेबाबत निश्चितता

‘आरटीई’ प्रवेशासाठी वयोमर्यादेबाबत निश्चितता
RTE
RTESaam tv

अमळनेर (जळगाव) : शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत १८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयान्वये मानीव (ठरविलेली) ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. या मानीव तारीख बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ते होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी (RTE) आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत निश्चित करण्यात आली असल्याचे पत्र २८ फेब्रुवारीला (Education) शिक्षण संचालनालयाचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर (पुणे) यांनी दिले आहे. (jalgaon Confirmation of age limit for RTE admission)

RTE
शेतकऱ्यांची फसवणूक; रब्बी ज्वारीची कणसे दाण्यांविना

शासनाने शाळा प्रवेशासाठी बालकाची किमान वयोमर्यादा ठरवलेली आहे. मात्र (Jalgaon News) कमाल वयोमर्यादा नसल्यामुळे तसेच मानीव तारखेमुळे अनेक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वयोमर्यादेबाबत ऑनलाइन पोर्टलवर, तसेच सर्व शाळांना (School) आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे, अशा सूचना शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी व सर्व प्रशासन अधिकारी (नपा / मनपा ) यांना दिले आहेत. वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी पुणे कार्यालयाकडे येणार नाहीत, असेही सूचित करण्यात आले आहे.

अशी असेल प्रवेशासाठी वयोमर्यादा

प्रवेशाचा वर्ग .... वयोमर्यादा .... ३१ डिसेंबर २०२२ अखेर वय

प्ले ग्रुप /नर्सरी ..... १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ ... ४ वर्ष ५ महिने ३० दिवस

ज्युनिअर केजी .....१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ .... ५ वर्ष ५ महिने ३० दिवस

सीनिअर केजी .... १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ .... ६ वर्ष ५ महिने ३० दिवस

इयत्ता पहिली ..... १ जुलै २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ ..... ७ वर्ष ५ महिने ३० दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com