रेल्वे पॅन्ट्रीकारमध्ये अन्‍न शिजविणे आता कठीण; गॅस वापरण्यास बंदी

रेल्वे पॅन्ट्रीकारमध्ये अन्‍न शिजविणे आता कठीण; गॅस वापरण्यास बंदी
Railway
RailwaySaam tv

जळगाव : रेल्वेतील आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाड्यामधील पॅन्ट्रीकारमध्ये गॅसचा वापर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पॅन्ट्रीकारचालक अडचणीत येणार आहे. प्रवाशांना गरम अन्नपदार्थ देण्यासाठी (Gas) गॅस वापरावा लागतो. तो आता बंद होईल. यामुळे प्रवाशांना गरम अन्नपदार्थ कसे द्यावेत? असा प्रश्‍न पॅन्ट्रीकारचालकासमोर आहे. (jalgaon news cook food in a railway pantry car No use of gas)

Railway
बीडमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

रेल्‍वेत (Railway) लांब प्रवास करत असलेल्‍या प्रवाशांना गरम जेवण देण्यासाठी रेल्‍वेत प्रॅन्‍ट्रीकारची बोगी असते. यात अन्‍न शिजवून ते प्रवाशांपर्यंत पोहचविले जाते. परंतु, गॅस नसल्‍याने गरम पदार्थ देणार कसे हा प्रश्‍न आहे. पर्याय म्हणून इलेक्ट्रीक शेगडीचा वापर करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे. मात्र या शेगड्या अन्न शिजवण्यास उपयोगी पडणार नसल्याचे पॅन्ट्रीकारचालकाचे म्हणणे आहे. पोळी, भाजी आदी स्वयंपाक करण्यासही मनाई करण्यात आली आहे. रेल्वेत प्रवाशांना संबंधित पॅन्ट्रीकारचालकाने बाहेरून हे पदार्थ बनवून प्रवाशांना द्यावेत, मात्र रेल्वे ते पदार्थ तयार करू नयेत अशा सूचना आहेत. कंत्राटदारांने बाहेरून पदार्थ तयार करून पाकीटाद्वारे प्रवाशांना पुरविण्याच्या सूचना आहेत.

चहा, कॉफी मिळणार

रेल्वेत गॅस वापरास बंदी असली तरी इलेक्ट्रीक शेगडी वापरण्यास परवानगी दिली आहे. प्रवाशांना चहा, कॉफी, दूध पदार्थ शेगडीवर गरम करून प्रवाशांना कंत्राटदार देवू शकतील. रेल्वे मात्र सर्व प्रकारचे शीतपेय विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

पॅन्ट्रीकारचे गॅस कनेक्शन काढले

रेल्वेतील पॅन्ट्रीकारचे गॅस कनेक्शन काढण्यात आली आहेत. त्याठिकाणी इलेक्ट्रीक शेगडी बसविण्याची परवानगी दिली आहे. अमृतसर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, पंजाब मेल, कर्नाटक एक्स्प्रेस आदी गाड्यांमध्ये पॅन्ट्रीकार होती.

रेल्वेने आगीच्या घटना टाळण्यासाठी पॅन्ट्रीकारमधील गॅसचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. पॅन्ट्रीकारचे कंत्राटदार इलेक्ट्रीक शेगडीवर अन्नपदार्थ गरम करून प्रवाशांना देवू शकतात. चहा, कॉफीही इलेक्ट्रीक शेगडीवर करता येईल.

जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ रेल्वे विभाग.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com